मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असते. मात्र जुलै महिन्यातील महागाईच्या टक्क्यात घट झाली असल्याचे समोर आले आहे.
जुलै महिन्यातील किरकोळ महागाईमध्ये घट झाली आहे. त्यामुळे आता महागाईचा दर ५.५९ टक्के झाला आहे. जून महिन्याच्या तुलनेत यामध्ये ०.६७ टक्के घट झाली आहे. जून २०२१ मध्ये महागाईचा दर ६.२६ टक्के होता तर गेल्या वर्षी जुलैमध्ये तो ६.७३ टक्के होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं गुरुवारी ही माहिती दिली.
हे ही वाचा:
शिक्षणाधिकाऱ्यांकडील मालमत्ता पाहून पोलिसही हबकले
भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून
अश्विनी उपाध्याय यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत
भारतात येणार चार नव्या हवाई कंपन्या?
गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच जुलै महिन्यात किरकोळ महागाईत घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे किरकोळ महागाईचा दर हा भारतीय रिझर्व्ह बँकेने ६ टक्क्यांच्या निश्चित केलेल्या मर्यादेच्या आतामध्ये आला आहे. जो यापूर्वीच सलग दोन महिन्यांत ६ टक्क्यांहून अधिक होता.
दरम्यान, जुलै २०२१ मध्ये जेवणही स्वस्त झालं आहे. ग्राहक खाद्य मूल्य निर्देशांक जुलै महिन्यात ३.९६ टक्क्यांवर राहिला. जून महिन्यात हा दर ५.१५ टक्के होता. गेल्या काही दिवसांत झालेल्या एका सर्वेक्षणात अर्थतज्ज्ञांनी जुलै मधील किरकोळ महागाईचा दर ५.७८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. जून महिन्यात खाण उत्पादनात २३.१ आणि वीज उत्पादनात ८.३ टक्के वाढ झाली आहे.