सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात दोन किडनी असतात. मात्र चेन्नईतील एका व्यक्तीच्या शरीरात पाच किडनी आहेत.
४१ वर्षाच्या या व्यक्तीवर किडनी प्रत्यारोपणाची तिसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता या व्यक्तीच्या शरीरात पाच किडनी आहेत. शस्त्रक्रियेनंतर मंगळवारी झालेल्या तपासणीनुसार रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तब्येतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी संगितले.
१९९४ मध्ये ही व्यक्ती १४ वर्षांची असताना तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. त्यानंतर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढे २००५ मध्येच म्हणजे पहिल्या शस्त्रक्रियेनंतर बरा वर्षांनी पुन्हा शस्त्रक्रियेची गरज भासली आणि म्हणून पुन्हा एकदा प्रत्यारोपण करण्यात आले. पुढील १२ वर्षे रुग्णाला काहीही त्रास नव्हता. मात्र नंतर चार वर्षानंतर रुग्णाला आठवड्यातून तीन वेळा डायलिसीस करण्याची गरज पडू लागली.
हे ही वाचा:
…तर खासगी बस व्यवसाय बंद पडेल!
केंद्राने देशभरात वितरित केल्या ५३ कोटी लशी
मदरशांनाही आणा शिक्षण हक्काच्या कक्षेत
ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले
रुग्णाचा रक्तदाब वाढल्यामुळे त्याच्यावरील झालेल्या पहिल्या दोन्ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या. मार्चमध्ये या व्यक्तीच्या हृदयातील ब्लोकेजेस काढण्यासाठी ट्रिपल बायपास सर्जरी करावी लागली. असे डॉ. एस सर्वनन यांनी सांगितले. परिस्थिती गंभीर झाल्यावर प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरला होता. ही शस्त्रक्रिया खूपच क्लिष्ट होती.
रुग्णाच्या शरीरात त्याच्या दोन किडनी होत्या ज्या निकामी झाल्या होत्या. याशिवाय दोन डोनर किडनी होत्या आणि आता पाचव्या किडनीला जागा करायची होती. रुग्णाच्या शरीरातून अतिरिक्त रक्त प्रवाह होऊ नये म्हणून चारही निकामी किडनी शरीरातच ठेवल्या. चार निकामी किडन्या तशाच ठेऊन नव्या किडनीला धमन्यांसोबत जोडणे हे खूप आव्हानात्मक होते. पाचव्या किडनीला आतड्यांच्या जवळ जागा केली गेली आणि किडनीला धमन्यांसोबत जोडले गेले. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणे दुर्मिळ आहे असे डॉक्टरांनी सांगितले.