हिमाचल प्रदेशात मोठे भूस्खलन झाले असून, त्यामध्ये एक ट्रक आणि एचआरटीसीची एक बस अडकली असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ही दोन्ही वाहने राडारोड्याखाली अडकली असल्याने जीवितहानीची भिती देखील व्यक्त केली जात आहे.
हिमाचल प्रदेशच्या किन्नुर जिल्ह्यात भूस्खलनाची घटना घडली आहे. इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी अपघातस्थळी बचावकार्याला सुरूवात देखील केली आहे. त्याबरोबरच एनडीआरएफला देखील तयार ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला देखील बचावकार्यात सहकार्य करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
हे ही वाचा:
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
मंत्री उदय सामंतांचा भाऊ कोकणचा सचिन वाझे?
मिश्र लसीच्या चाचणीला डीसीजीआयची परवानगी
औरंगाबाद महापालिकेतही होता तळीरामांचा अड्डा?
“आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, एक बस आणि एक गाडी अडकली असण्याची शक्यता आहे……..अधिक माहिती मिळण्याची प्रतिक्षा आहे” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
याबाबत किन्नुरच्या मुख्य पोलिस अधिक्षक साजू राम राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावरील भाबा नगर पोलिस ठाण्याजवळ भूस्खलन झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर आयटीबीपी, पोलिस, होम गार्ड आणि बचाव दल यांना त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. ते अधिक माहिती प्रत्यक्षात तिथे पोहोचल्यानंतर देऊ शकतील असे देखील त्यांनी सांगितले. याबद्दल अधिक माहिती अपेक्षित आहे.