यंदाच्या वर्षी भारत देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे कारणार आहे. अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुस्तकप्रेमींना स्वातंत्र्याचे विविध पैलू समजावेत तसेच स्वतंत्र्य लढ्याचा अर्थ आणि इतिहास विविध पुस्तकांमधून समोर यावा, यासाठी ग्रंथ प्रदर्शन आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये कोलकाता येथील राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान आणि ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने या काळात ग्रंथालय प्रदर्शने आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सोमवारी विविध ग्रंथालयांमध्ये प्रदर्शनांना सुरुवात करण्यात आली आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वतीने राज्य मध्यवर्ती ग्रंथालय येथे ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हे ही वाचा:
मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे ठाकरे सरकारचं धोरण
मंत्रालयात दारूच्या बाटल्या ही काळीमा फासणारी घटना
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सावानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते १५ ऑगस्ट, संविधान दिनाच्या निमित्ताने २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीमध्ये ग्रंथालयांनी प्रदर्शने आयोजित करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
१२ ऑगस्ट रोजी असलेल्या राष्ट्रीय ग्रंथपाल दिनी वरळी येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे ऐतिहासिक, सरकारी प्रकाशने, मराठीतील निवडक साहित्य यांच्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड यांनी दिली. मध्यवर्ती ग्रंथालयातील प्रदर्शनात महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांकृतिक, ऐतिहासिक, विज्ञान, कला, क्रीडा तसेच साहित्य अशा विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.