पेगासस प्रकरणी सुप्रिम कोर्टाने याचिकाकर्त्यांची घेतली शाळा
पेगासस हेरगिरी संदर्भातील चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांला सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान चांगलेच दटावले. ‘सोशल मीडियावर समांतर चर्चा करू नका. व्यवस्थेवर थोडा तरी विश्वास ठेवा’, असं सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सांगितलं. याचिका वाचण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी अधिक वेळ मागितल्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली.
या याचिकेची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचे नेतृत्व करत असलेले सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी याचिकाकर्त्यांना आणि त्यांच्या वकिलांना आठवण करून दिली, “प्रकरण न्यायालयात असेल तेव्हा येथे चर्चा व्हायला हवी” असे सरन्यायाधीश म्हणाले. कुणीही मर्यादांचे उल्लंघन करू नका. या प्रकरणी सर्वांना संधी दिली जाईल, असं सरन्यायाधीश याचिकाकर्त्यांना आणि सॉलिसिटर जनरलना म्हणाले. तसंच सोशल मीडियावर समांतर चर्चेपासून दूर राहा, अशी ताकीदही कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिली. तसंच जे काही सांगायचं आहे, ते कोर्टात सांगा. तुम्ही एकदा कोर्टात आला तर तिथेच युक्तीवाद करा, असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं. सॉलिसिटर जनरलनी आणखी वेळ मागितल्याने कोर्टाने सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली.
पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी चर्चेची मागणी लावून धरल्याने संसदेत गदारोळ सुरूच आहे. या हेरगिरी प्रकरणावरूनच तब्बल २१ दिवस संसदेचं कामकाज विस्कळीत होतं. विरोधी पक्षांनी संसदेच्या संयुक्त समितीद्वारे या प्रकरणी चौकशीची मागणी केलेली आहे.
हे ही वाचा:
कोविड योद्धा मानत असाल तर अभियंत्यांना पदोन्नती द्या!
एका ताऱ्याचा मृत्यु- सुपरनोव्हा
भारताने अफगाणिस्तानमधून नागरिक परत बोलावले
हेरगिरी संदर्भातील हे प्रकरण २०१९ या वर्षात समोर आलं होतं. परंतु त्यावेळी मात्र या प्रकरणावर कुणीच काही बोललं नाही. यावर दोन वर्षांनीच का चर्चा घडत आहे असा खडा सवालही सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारला.