26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषएका ताऱ्याचा मृत्यु- सुपरनोव्हा

एका ताऱ्याचा मृत्यु- सुपरनोव्हा

Google News Follow

Related

एखाद्या ग्रामीण भागात गेल्यानंतर मिट्ट काळोखात आपल्याला आकाशात नक्षत्रांची उधळण झालेली पहायला मिळते. कित्येक तारकासमुह, नक्षत्र आकाशात पसरलेले असतात. लहानमोठ्या आकाराचे तारे लुकलुकताना पाहतो, परंतु या ताऱ्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला कमी माहिती असते. काही दिवसांपूर्वीच केप्लर स्पेस टेलिस्कोपने एका ताऱ्याचा मृत्यु पाहिला. ताऱ्याचा मृत्यु पहायला मिळणं ही दुर्मिळ अवकाशीय घटनांपैकी एक आहे. ती घटना यावेळी प्रथमच एका दुर्बिणीद्वारे टिपली गेली आहे. ताऱ्याचा मृत्यु म्हणजे नेमकं काय? जर ताऱ्याचा मृत्यु होतो तर त्याचा जन्मही होतो का? अवकाशात अशा घटना घडताना आपल्याला दिसू शकतात का? याबद्दल आपण थोडी जुजबी माहिती घेऊ.

त्यापुर्वी केप्लर स्पेस टेलिस्कोप हा अमेरिकेच्या नासामार्फत अवकाशात प्रस्थापित केलेला टेलिस्कोप आहे. हबल टेलिस्कोप प्रमाणे अवकाशात राहून अवकाशीय घटनांवर लक्ष ठेवण्याचे काम केप्लर दुर्बिण करते. सुपरनोव्हा सारखी दुर्मिळ अवकाशीय घटना या दुर्बिणीने नुकतीच टिपली आहे.

आपण लहानपणापासून शिकत आलो की अवकाशात तारे स्वयंप्रकाशी असतात तर ग्रहांना या ताऱ्यापासून ऊर्जा आणि प्रकाश मिळतो. ताऱ्याचा जन्म हा अवकाशातील अनेक चमत्कारिक घटनांपैकी एक म्हटला पाहिजे. सामान्यतः हायड्रोजन हे ताऱ्याचं इंधन असतं. ताऱ्याचा जन्म देखील अनंत वैज्ञानिक प्रक्रियांचे दृश्यरूप म्हणून आपल्याला दिसतो. या ताऱ्यांच्या गर्भात घडणाऱ्या वैज्ञानिक प्रक्रियाच ताऱ्याला जिवंत ठेवत असतात.

हे ही वाचा:

१५ वर्षांच्या मुलीने का केली आईची हत्या?

एल्गार परिषदप्रकरणी १५ जणांविरूद्ध आरोपपत्र

तृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर

अबब!! त्यांनी घातला अडीच लाखांचा घोळ

ताऱ्यातले हायड्रोजनचे इंधन संपत येते तेव्हा तारा मरणपंथाला लागतो. हायड्रोजन संपला की ताऱ्याच्या गर्भाचे आकुंचन व्हायला सुरूवात होते. त्यावेळेला हायड्रोजनचे हिलीयममध्ये रुपांतर होत असते. तारा आकुंचित व्हायला लागल्यानंतर हिलीयमचे ज्वलन होऊन कार्बन आणि ऑक्सिजन यांची निर्मिती व्हायला लागते. पुढे एका वेळेला हिलीयम देखील संपुष्टात येतो आणि तारा आणखी स्वतःत कोसळू लागतो. या प्रक्रियेत ताऱ्याच्या गर्भात अधिकाधीक जड मूलद्रव्ये निर्माण होत जातात. अखेरीस सिलीकॉनच्या लोखंडात रुपांतर होण्याच्या प्रक्रियेपाशी ही साखळी संपते. त्यामुळे गुरूत्वाकर्षण बलाच्या प्रभावात तारा अधिकाधीक दबला जातो आणि एका क्षणाला ताऱ्याचे न्युट्रॉन ताऱ्यात रुपांतर होते. या प्रक्रियेत ताऱ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते, ज्यामुळे ताऱ्याच्या बाह्य भागाचा स्फोट होतो. यालाचा सुपरनोव्हा किंवा अतिनव तारा असं संबोधलं जातं.

हा धमाका पहायला मिळणं ही दुर्मिळ अवकाशीय घटना आहे. वाचताना जरी ही घटना सामान्य किंवा खरोखरच एखाद्या मिनीटाची वाटली, तरी प्रत्यक्षात धमाका हा काही दिवसांपर्यंत दिसू शकतो. सुपरनोव्हा काही आठवडे देखील टिकू शकतो. त्यामुळे हा पाहण्यासाठी अवकाशातील योग्य ठिकाणी योग्य वेळी पाहणं आवश्यक असतं.

सुपरनोव्हा यापुर्वी मानवाने विविध वेळा पाहिला आहे. यापूर्वी १००६, १०५४, ११८१, १५७२, १६०४ या साली सुपरनोव्हा पाहिले गेले होते. १५७२ आणि १८६०४ मध्ये अनुक्रमे टायको ब्राहे आणि योहान्नस केप्लर यांनी देखील सुपरनोव्हांची नोंद केलेली आढळते. त्याबरोबरच सध्याच्या काळात मृग नक्षत्रातील काक्षी नावाचा एक तारा देखील सुपरनोव्हा होण्याच्या मार्गावर आहे. हा तारा पृथ्वीपासून ५५० प्रकाशवर्ष दूर आहे. याचा अर्थ, आज आपण पाहत असलेला तारा हा प्रत्यक्षात ५५० वर्ष जुना आहे. त्यामुळे त्याचा सुपरनोव्हा केव्हा होईल हे नेमकेपणाने सांगता येणे अवघड आहे.

सुपरनोव्हा ही क्वचित केव्हातरी घडणारी अवकाशीय घटना आहे. आपल्या आयुष्यात एकदाच अशी संधी चालून येऊ शकते. त्यामुळे जर अशा प्रकारे एखाद्या दुर्बिणीद्वारे सुपरनोव्हा टिपला जात असेल, तर त्याकडे लक्ष दिले पाहिजे. संधी मिळाल्यास त्याचे निरिक्षण देखील जाऊन अवश्य केले पाहिजे. चुकवू नये अशी ही खगोलिय घटना आहे.

– प्रणव पटवर्धन

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा