25 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामापत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!

पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!

Google News Follow

Related

आपल्या पत्नीला गावावरून मुंबईला बोलवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्याच मुलांचा वापर करून एक नाट्य रचले. हे प्रकरण पाहून पोलिसही हबकून गेले. त्या व्यक्तीविरोधात शेवटी पोलिसांना कारवाई करावी लागली.ट

त्या व्यक्तीने मुलीच्या गळ्यात फास अडकवला आणि मुलाच्या खोट्या प्रेताचे फोटो आपल्या पत्नीला पाठवले. मुलीने आत्महत्या केली आणि मुलाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती त्याने आपल्या पत्नीला कळवली आणि मुंबईला येण्यास सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुरार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले आणि त्या व्यक्तीला मुलांना मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

आपला भाऊ व्यसनाधीन असून तो दारू पिऊन त्याच्या पत्नीला आणि मुलांना मारहाण करत होता. त्याच्या जाचाला कंटाळूनच त्याची पत्नी मुलांना घेऊन गावी गेली होती, असे कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा सूचित गौड (३३) याने सांगितले. तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्या व्यक्तीने आपल्या १३ वर्षाच्या मुलीला आणि आठ वर्षाच्या मुलाला मुंबईला आणले होते आणि नशेत तो त्यांना मारहाण देखील करत असे.

हे ही वाचा:

गेले देशमुख कुणीकडे?

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

पुणे मेट्रो विरोधकांना उच्च न्यायालयाचा फटकार

शनिवारी सकाळी त्या व्यक्तीने आपल्या आठ वर्षाच्या मुलाला जमिनीवर झोपवून त्याच्यावर पांढरा कपडा अंथरला आणि फुलांचे हार घालून त्याचे प्रेत असल्याचे भासवले. १३ वर्षीच्या मुलीला पंख्याला बांधलेल्या ओढणीने गळफास घेण्यास सांगितले, परंतु मुलीने विरोध केल्यावर तिला पंखा चालू करण्याची धमकी दिली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरात प्रवेश करून दोन्ही मुलांची या आरोपीपासून सुटका केली, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वेले यांनी दिली.

घटनास्थळी पोहचताच पोलिसांनी आरोपीला अटक करून अधिक चौकशी केल्यावर पत्नीला गावावरून बोलावण्यासाठी हे सर्व नाट्य केल्याचे उघड झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा