26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामा१५ वर्षांच्या मुलीने का केली आईची हत्या?

१५ वर्षांच्या मुलीने का केली आईची हत्या?

Google News Follow

Related

आई वडिलांना ती डॉक्टर होताना बघायचे होते, त्यासाठी तिने खूप अभ्यास करावा आणि सीईटी मध्ये चांगले गुण मिळवावे म्हणून तिच्यासाठी ट्युशन लावली, तिला हवे नको ते पाहिले. पण…

तिने अभ्यास करावा म्हणून आई तिला सतत ओरडायची, मात्र तिला आईने ओरडणे आवडत नव्हते. शेवटी तिने आईची हत्या केली. मुख्य म्हणजे ही आत्महत्या वाटावी म्हणून आईच्या मोबाईलवरून मामा, वडील आणि मावशीला मेसेज केले. मात्र शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे उघड होताच रबाळे पोलिसांनी १५ वर्षांच्या मुलीविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिल्पा जाधव (४७) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे. शिल्पा या पती, १५ वर्षाची मुलगी आणि ६ वर्षाच्या मुलासह नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर नंबर ७ येथे एका इमारतीत राहण्यास होत्या. मुलीने डॉक्टर व्हावे, अशी आई वडिलांची इच्छा होती. नुकतीच मुलगी दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. मात्र चांगले कॉलेज मिळावे, सीईटी मध्ये चांगले गुण मिळावेत, यासाठी वडिलांनी सीईटीसाठी ट्युशन लावले होते.
मुलीने अभ्यास करावा व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून आई शिल्पा मुलीला सतत अभ्यास करण्यासाठी ओरडत असायची. ३० जुलै रोजी दुपारी शिल्पाच्या मोबाईल क्रमांकावरून ‘आय ट्राइड एव्हरीथिंग आय क्वीट’ (I tried everything I quit) असा मेसेज शिल्पा हिचा भाऊ शैलेश, पती आणि बहिणीला दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास करण्यात आला होता. दरम्यान जवळच राहणारा भाऊ शैलेश यांनी बहिणीच्या घरी धाव घेतली असता १५ वर्षांची भाची आणि ६ वर्षांचा भाचा हे दोघे घरी होते. दोघे रडत होते व आई बेडरूमचे दार उघडत नाही, असे सांगितले असता भाऊ शैलेश याने बेडरूमचे दार लाथ मारून तोडले आणि आत प्रवेश केला. तेव्हा बहीण शिल्पा बेडवर निपचित पडली असल्याचे दिसले. तिच्या गळ्याभोवती कराटेचा बेल्ट फास लावलेल्या अवस्थेत होता.

हे ही वाचा:
तृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर

अबब!! त्यांनी घातला अडीच लाखांचा घोळ

काय आहेत आयपीएलसाठीचे नवे नियम?

जम्मू आणि काश्मिरमध्ये ‘या’ ठिकाणी फडकला १०० फूट उंच झेंडा

शैलेशने शिल्पाच्या गळ्याभोवती असलेली बेल्टची गाठ सोडवली आणि या घटनेची माहिती रबाळे पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिल्पाला ताबडतोब वाशी येथील महानगर पालिकेच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात शिल्पा यांचा मृत्यु गळा आवळून झाला असून तिच्या डोक्याला जखम असल्याचे म्हटले होते. म्हणजे शिल्पाने आत्महत्या केली नसून हत्या झाल्याचे जवळ जवळ उघड झाले होते. मात्र ही हत्या कोणी व का केली हा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला. पोलिसांनी तपास सुरू करून चौकशी सुरू केली.

शिल्पा यांची १५ वर्षाची मुलीच्या वागण्यात पोलिसांना संशय आला, म्हणून पोलिसानी तिच्यावर लक्ष ठेवले. अखेर तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी सुरू केली असता तिने गुन्हयाची कबुली दिली. ‘आई मला सतत अभ्यासावरून ओरडत असायची, आणि मारहाण करायची, त्यामुळे आमच्यात नेहमी वाद होत होते. ३० जुलै रोजी आई मला ओरडत बेडरूममध्ये आली आणि आमच्यात झटापट झाली आणि त्यात मी आईला जोरात धक्का देऊन लोटले. त्यात आईच्या डोक्याला बेडचा कोपरा लागला आणि आणि बेशुद्ध पडली, त्यानंतर मी कराटेचा बेल्ट घेऊन आईचा गळा आवळला. आईने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी तिच्याच मोबाईलवरून वडील, मामा आणि मावशीला मेसेज केला,’ अशी कबुली ताब्यात घेतलेल्या १५ वर्षीय मुलीने पोलिसांना दिली. तिचा जबाब ऐकून पोलीस देखील हादरले. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी मुलीविरुद्ध आईचा खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. तिची रवानगी महिला बाल सुधारगृहात करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा