भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीस अवघे काही दिवस शिल्लक असताना समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रत्येक भारतीयाला हा भारत ‘नवा भारत’ असून तो बदलला असल्याची पुन्हा एकदा स्पष्ट जाणीव झाली असेल.
७५ व्या स्वातंत्र्यदिनाला काही दिवस शिल्लक राहिले असतानाच जम्मू आणि काश्मिर केंद्रशासित प्रदेशातील गुलमर्ग या प्रसिद्ध पर्यटनस्थळी जम्मू आणि काश्मिरमधील सर्वात उंच झेंड्याचे आरोहण केले. गुलमर्ग मधील हा झेंडा तब्बल १०० फूट उंचीचा आहे.
हे ही वाचा:
भारतात उपलब्ध होणार आणखी एक लस!!
भारतात विदेशी नागरीकांचे लसीकरण
चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?
श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले
या बाबत भारतीय सैन्यातर्फे एक प्रसिद्धीपत्रक देखील काढण्यात आले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, १०० फूट उंचीचा भारतीय झेंडा काश्मिरमधील शांतता आणि राष्ट्रभावनेचे प्रतिक आहे. हा प्रकल्प भारतीय सैन्य आणि सोलर इंडस्ट्रीज प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला होता. या प्रकल्पाला सुरूवात ७ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली होती आणि १० ऑगस्ट २०२१ रोजी या झेंड्याचे राष्ट्रार्पण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर भारतीय सैन्याने त्या झेंड्याला सलामी दिली होती.
यापूर्वी देखील बदलत्या भारताची चिन्हे काश्मिरमध्ये दिसली होती. श्रीनगरच्या सुप्रसिद्ध हरि पर्बत किल्ल्यावर १०० मीटर उंचीचा ध्वज लावण्यात येणार आहे. त्याबरोबरच एकेकाळी भारत विरोधी आंदोलनांमुळे कुप्रसिद्ध असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात देखील तिरंग्याची रोषणाई करण्यात आली होती.