गटारीच्या निमित्ताने मद्यपान करून शहरामध्ये धुडगूस घालणाऱ्या तळीराम वाहनचालकांवर ठाणे वाहतूक शाखेच्या विशेष पथकांनी कारवाई केली.
दोन दिवसांमध्ये ठाणे वाहतूक शाखेच्या विशेष पथकांनी ११५ तळीरामांवर कारवाई केली आहे. श्रावण महिन्याच्या आगमनाच्या काही दिवस आधी गटारीच्या निमित्ताने शहरात जागोजागी ताळीरामांकडून पार्ट्या केल्या जातात. त्यामुळे होणारे अपघात आणि गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष पथके तयार केली होती.
वाहतूक शाखेने १८ युनिटमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश असलेले विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाकडून शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ११५ वाहनचालक आणि ४४ त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पुढेही अशीच सुरू राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेने दिली आहे. वाहतूक शाखेच्या विशेष कारवाईमध्ये मुंब्रा वाहतूक उपविभागात सर्वात जास्त मद्यपींवर कारवाई करण्यात आली. ठाणेनगर आणि कासारवडवली वाहतूक उपविभागात सर्वात कमी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा:
१५ ऑगस्टचे ध्वजारोहण रोखा आणि दहा लाख डॉलर कमवा
शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र
चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?
श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले
येऊरच्या जंगलात पार्ट्या करून धुडगूस घालणाऱ्या तळीरामांना रोखण्यासाठी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी (येस) तर्फे ग्रीन गटारीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रीन गटारीच्या आयोजनासाठी येसचे समन्वयक रोहित जोशी यांनी विशेष मेहनत घेतली होती.
मोटार वाहन कायदा कलम १८८ अन्वये ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई अशीच चालू राहणार असून मद्यपान करून वाहने न चालवण्याचे आवाहन ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी वाहनचालकांना केले आहे.