महाराष्ट्राला गड किल्ले यांची अतिशय समृद्ध परंपरा लाभलेली आहेत. गड किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मध्यंतरी गड किल्ले लग्न समारंभासाठी देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यामुळे इतिहासप्रेमी खूपच चिडले होते. ठाकरे सरकारकडून या गड किल्ले संवर्धनापेक्षा महसूल गोळा करण्याकडे जास्त लक्ष आहे. राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी शासनाने राज्य किल्ले योजना सुरू केली. संवर्धन दूरच परंतु महसुलाकडेच लक्ष अधिक आहे. यासंदर्भात तमाम शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले आहे.
आपल्या वैभवशाली इतिहासाला जपण्यासाठी शासनाने पुढे येणे गरजेचे आहे. तरच गडकोटांना भेटी देणारे इतिहासाचे संवर्धन आणि जपणूक करतील. आपल्याकडे आजच्या घडीला असे अनेक गड किल्ले आहेत, तिथे पोहोचण्यासाठी वाटा व्यवस्थित नाहीत. सुविधा तर दूरचीच गोष्ट. ऐतिहासिक पावित्र्य जपण्याविषयी लोकांमध्ये फार आस्था दिसून येत नाही. अशा अनेक गोष्टींवर खासदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मांडल्या आहेत.
गडकिल्ले व्यवस्थापन समिती गठित करण्याची मागणीही यावेळी केली आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी योग्य ती पावले लवकरात लवकर उचलली जावी, असे ठाकरे सरकारकडे खासदार संभाजी राजे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.
हे ही वाचा:
व्यवसायिक अविनाश भोसलेंची ही मालमत्ता ईडीकडून जप्त
चक्क वकिलालाच पोलिस ठाण्यात ठेवले डांबून
मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी आता टीशर्ट घाला
चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?
सद्यस्थितीस महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले मोडकळीस आले असून याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही. शासनदरबारी असलेली उदासिनता किल्ले संवर्धनासाठी दिसून येत आहे. एरवी मराठी अस्मिता म्हणून गळे काढणारे महाराजांचे किल्ले संवर्धन करण्यासाठी आता का पुढे येत नाहीत असाच सवाल आता इतिहासप्रेमींकडून विचारला जात आहे.