24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारण...तसं तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही स्टेजवर तलवार घेऊन पाहिलंय

…तसं तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही स्टेजवर तलवार घेऊन पाहिलंय

Google News Follow

Related

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुंबईतील शिवाजी नगर गोवंडी भागात कार्यकर्त्यांनी ही मिरवणूक काढली. समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेल्या या मिरवणुकीत अबू आझमी यांनी हातात तलवार नाचवल्याचंही पाहायला मिळालं. सामान्य नागरिकांना लोकलचा प्रवासही नशिबी नसताना, ठाकरे सरकार अबू आझमींना तलवारी नाचवत मिरवणूक साजरी करण्याची परवानगी कशी काय देऊ शकते? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

ती तलवार धारदार नव्हती, तर फक्त शोबाजीची होती. तसं तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही स्टेजवर तलवार घेऊन पाहिलंय, असं स्पष्टीकरण अबू आझमींनी दिलं. अबू आझमी यांच्या वाढदिवासाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले. पोलिसांसमोर कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. शिवाजीनगर परिसरात निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने समर्थक सहभागी झाले होते.

या शेकडोच्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते रॅली मध्ये सहभागी झाले होते. यावेळी फटाके फोडून, घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कहर म्हणजे यावेळी अबू आझमी यांनी हातात तलवार घेऊन तिचे प्रदर्शन देखील केले. यावेळी पोलीस मात्र बघाच्या भूमिकेत दिसून आले. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. याबाबत अबू आझमी यांना विचारले असता त्यांनी हे कार्यकर्त्यांचे प्रेम असल्याचे सांगितले. तसेच ती तलवारी मारण्यासाठी नव्हती, आम्ही पूरग्रस्तांना मदत गोळा करीत आहोत अशी सारवासारव केली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात रेल्वेनिर्णयाचा एकच डोस, बाकी ओस

केवळ दोन डोस घेतलेल्यांनीच मॉलमध्ये जा…..वाचा सविस्तर!!

लक्ष विमान प्रवाशांची संख्या झेपावण्याकडे

सणांचा, व्रतांचा ‘राजा’ आला…

या प्रकरणी  आमदार अबू आझमी यांच्यासह शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधक आदेश व जमावबंदी आदेशाचा भंग केला. तसंच अबू आझमी व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार हे हत्यार बाळगलं असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणात आमदार अबू आझमी, फवाद खान उर्फ आझमी, इरफान खान, गैसउददिन शेख, आयशा खान, अक्तर कुरेशी, मनोज सिंग, सद्दाम खान, तौसीफ खान, जावेद सिद्दिकी, नौशाद खान, वसिम जाफर शेख, अकबर खान, इर्शाद कुरेशी ऊर्फ बबलू लोटस, रईसा सय्यद, शेहजाद ऊर्फ सय्यद, शकील पठाण, रुक्साना सिद्दिकी आणि इतर काही अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा