कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार खबरदारीचा उपाय म्हणून गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षीचीच नियमावली लागू करणार आहे. सार्वजनिक ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. दरवर्षी मुंबईत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते. या वर्षी प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद केलेली नाही, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
गेल्यावर्षी प्रमाणे या वर्षीही १६८ कृत्रिम तलाव उभारले जाणार असून गरज असल्यास त्यांची संख्या वाढवण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ट्रक व लॉरीतून गणेशमूर्ती नेल्यास मूर्ती भंग होण्याची शक्याता नाकारता येत नाही, म्हणून भाजपने या निर्णयाला विरोध केला आहे. पालिका प्रशासनाने कृत्रिम तलाव न उभारल्यास भाजप स्वखर्चाने कृत्रिम तलावांची निर्मिती करेल, असा इशारा भाजपने दिला आहे.
हे ही वाचा:
भारताच्या लस उत्पादनात वाढ
नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस
मुंबईच्या किनाऱ्यावर आढळली धक्कादायक गोष्ट
राहुल गांधींचा ‘हा’ प्रयत्न ठरला फोल
प्रत्येक विभागातील कृत्रिम तलावाकरिता तरतूद केलेली आहे तसेच विसर्जनाच्या इतर लागणाऱ्या कामांसाठीही तरतूद केलेली आहे. मागील वर्षी जितके तलाव उभारले होते तितकेच यावर्षीही उभारण्याचे विभागीय कार्यालयांना सांगण्यात आलेले आहे. गर्दी टाळण्यासाठी गरज भासल्यास अधिकचे तलाव उभारण्यात येतील आणि त्याबाबतचे निर्णय घेण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत असे उपायुक्त हर्षद काळे यांनी सांगितले. मात्र ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारणे शक्य नाही, अशा ठिकाणी फिरत्या वाहनांमधून गणेशमूर्ती स्वीकारण्याची सोय करण्यात आलेली आहे असेही त्यांनी सांगितले.