28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणराऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?

राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?

Google News Follow

Related

शिवसेना नेते संजय राऊत यांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आल्याने त्यावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी समाचार घेतला आहे.

राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का? असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे. प्रविण दरेकर माणगावला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. पुरस्काराचं नाव बदललं म्हणून राऊत टीका करत आहेत. पण त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांनी किती योजनांची नावं बदलली ते पाहावं, असा चिमटा काढतानाच राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का? असा सवाल दरेकर यांनी केला.

सरकारने मदत तर जाहीर केलेली आहे. पण ती खरंच पूरग्रस्तांना पोहोचली आहे की नाही त्याची पाहणी मी आज करणार आहे. त्यासाठीच माणगावला आलो आहे. रायगड जिल्ह्यातील माझा हा तिसऱ्यांदा दौरा आहे. व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यासंदर्भात आज मी महाडच्या व्यापारी संघटनांसोबत बैठक सुद्धा घेणार आहे, असं दरेकर म्हणाले.

हे ही वाचा:

मुंबईतील ‘या’ रुग्णालयात झाली गॅस गळती

नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस

राहुल गांधींचा ‘हा’ प्रयत्न ठरला फोल

बारा वर्षांखालील मुलांना लस कधी मिळणार?

यावेळी त्यांनी पुणे मेट्रो प्रकल्पावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पुणे मेट्रोची सगळी कामं ही भाजपाच्या काळात झालेली आहेत. परंतु फक्त सत्ता असल्यामुळे उद्घाटन करण्याचा मान या महाविकास आघाडी सरकारला मिळाला आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच गल्लीतल्या नेत्यानी पंतप्रधानांवर टीका करू नये, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा