22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाचीनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

चीनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

Google News Follow

Related

चीनमध्ये शिकण्यास गेलेल्या एका विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. हा बिझनेस स्टडीजचा विद्यार्थी आहे. या तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूचे वार केल्याच्या खुणा आढळल्या असून चीनमध्येच करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून ही बाब उघड झाली आहे. मात्र चीनकडून आता याबाबतचे रिपोर्ट देण्यात टाळाटाळ होत असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

हा विद्यार्थी मूळचा बिहारच्या गया येथे राहणारा होता. नागसेन अमन असे त्याचे नाव असून तो चीनमधील विद्यापीठात बिझनेसचे शिक्षण घेत होता. त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.  त्याचा मृतदेह विद्यापीठातील खोलीत कित्येक दिवस पडून होता. कुणालाही त्याबाबत काही माहिती देखील नव्हती. काही दिवसांनी जेव्हा हा मृतदेह सडू लागला, तेव्हा त्याचा वास विद्यापीठात पसरायला सुरुवात झाली. त्यामुळेच या हत्येचा उलगडा झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन चीनमध्येच एका भारतीय विद्यार्थ्याच्या उपस्थितीत करण्यात आले.

हे ही वाचा:

शर्लिन चोप्राच्या जबाबातून आता पोलखोल होणार

बापरे ! महाराष्ट्रातील पुरांच्या घटनांत झाली आहे इतकी भयंकर वाढ

भाजपा नेते, रा.स्व.संघ नेत्यांनंतर आता धोनीचा नंबर

अनिल देशमुख प्रकरणात कोण धमकावत आहे सीबीआयला?

चीनमध्येच अमनच्या मृतदेहाचं विच्छेदन करण्याचा निर्णय अमनच्या कुटुंबीयांनी घेतला. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेला भारतीय विद्यार्थी सिद्धार्थ जुमरानी याच्या उपस्थितीत पोस्टमार्टेम करायला अमनच्या कुटुंबीयांनी मान्यता दिली होती. सिद्धार्थने दिलेल्या माहितीनुसार अमनच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.

चीनकडून पोस्टमार्टम होईपर्यंत तत्परता दाखवण्यात आली, मात्र त्यानंतर कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यापासून अमनचे पार्थिव पाठवण्यापर्यंत कुठल्याच बाबतीत चीनकडून प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर भारत सरकारनं मध्यस्थी केल्यानंतर चीन सरकारकडून हालचाली करण्यात आल्या आहेत. नागसेन अमन याचा मृतदेह आता ११ ऑगस्टला भारतात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याची कल्पना अमनच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून भारताच्या परराष्ट्र खात्याचे अधिकारी या प्रकरणी पाठपुरावा करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा