27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषभारतामध्ये लसीच्या परवानगीसाठी 'या' कंपनीकडून अर्ज

भारतामध्ये लसीच्या परवानगीसाठी ‘या’ कंपनीकडून अर्ज

Google News Follow

Related

भारतामध्ये कोविडविरूद्धच्या लसीकरणासाठी आणखी एका लस लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भारतातील लसीकरणाला अधिक वेग प्राप्त होणार आहे. या लसीच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे.

भारतामध्ये लसीकरणासाठी अमेरिकेतील नोवावॅक्स या कंपनीने लसीच्या मान्यतेसाठी डीसीजीआयकडे अर्ज केला आहे. नोवावॅक्सने हा अर्ज त्यांची भारतातील भागीदार कंपनी सीरम इन्स्टिट्युटसोबत केला आहे. सीरम इन्स्टिट्युट जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सीरममोबत नोवावॅक्सने लस उत्पादनाचा करार देखील केला आहे. सीरम इन्स्टिट्युट सध्या ऑक्स्फर्ड- ॲस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड या लसीचे उत्पादन देखील करत असून, भारतीय लसीकरण मोहिमेत कोविशिल्डचा मोठा वाटा आहे.

भारतासोबतच नोवावॅक्सने त्यांच्या लसीच्या मान्यतेसाठी इंडोनेशिया आणि फिलिपिन्सकडे देखील अर्ज केला आहे. हा अर्ज आपात्कालिन वापरासाठी करण्यात आला आहे.

सीरम इन्स्टिट्युट आणि नोवावॅक्सने लसीला मान्यता मिळावी यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा केली आहेत. त्यामध्ये विविध स्तरावर लसीची घेण्यात आलेली चाचणी, आणि त्याचा निकाल त्याबरोबरच उत्पादनाचे सूत्र इत्यादी विविध कागदपत्रांचा समावेश आहे. त्याबरोबरच डीसीजीआयकडून सीरमच्या उत्पादन पद्धती आणि स्थळाची पाहणी देखील मे २०२१ मध्ये करण्यात आली होती.

हे ही वाचा:

काय ठरलं राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत?

‘संसदेचं अधिवेशन चालू द्या’ म्हणत ‘या’ खासदाराचं आंदोलन

हिंदुत्वाबद्दल मनसे नेते नांदगावकर म्हणाले…

आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

नोवावॅक्सची लस देखील दोन मात्रांमध्ये दिली जाणार आहे. या लसीमध्ये कोरोना विषाणूच्या काटेरी आवरणाला घेरणाऱ्या विशिष्ट प्रथिनांचा समावेश करण्यात आला आहे.

जून महिन्यामध्ये नोवावॅक्सकडून या लसीची परिणामकारकता ९० टक्के असल्याचा दावा करण्यात आला होता. अमेरिका आणि मेक्सिकोतील सुमारे ३०,००० लोकांचा अभ्यास करून मग हा निष्कर्ष काढण्यात आला होता. या लसीचा परिणाम त्या काळात त्या देशांत असलेल्या उत्परिवर्तनाविरूद्ध देखील पाहण्यात आला होता. या लसीचे इतर दुष्परिणाम अगदीच सौम्य असल्याचे देखील पाहण्यात आले होते.

नोवावॅक्स ही लस २ अंश सेल्सियस आणि ८ अंश सेल्सियस या दरम्यान सुरक्षितपणे साठवली जाऊ शकते. त्यामुळे या लसीच्या वापरासाठी सध्या अस्तित्वात असलेली पुरवठा साखळी सहजपणे वापरता येणार आहे. या लसीच्या एका कुपीतून १० डोस दिले जाऊ शकणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा