वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा कार्यारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला असला तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तीन वर्षांपूर्वी त्याचा भूमिपूजन समारंभ झालेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या कामाचा शुभारंभ करण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित होत आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ही कबुली दिली की, तीन-चार वर्षांपूर्वी या पुनर्विकास प्रकल्पाचा नारळ फोडण्यात आला होता. पण आम्ही पुन्हा या प्रकल्पाला सुरुवात करत आहोत.
एप्रिल २०१७मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा हा शुभारंभ करून श्रेय घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात आहे, अशी टीका होऊ लागली आहे.
स्व-स्तुतीसुमनांचा वर्षाव
या कार्यारंभासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र स्व-स्तुतीसुमनांमध्येच मश्गुल राहिले. या कार्यक्रमात भाषण करताना ते म्हणाले की, मी इथे येत असताना दुतर्फा माता भगिनी उभ्या होत्या. हातात फुलं होती. मग मला राहावलं नाही म्हणून मी गाडीतून उतरलो आणि त्यांच्यातून चालत आलो.
लोक माझ्यावर पुष्पवृष्टी करत होते त्यामुळे मी गाडीतून खाली उतरून लोकांमध्ये मिसळून चालत आलो, असे मुख्यमंत्री म्हणाले. माझ्यावर पुष्पवृष्टी होत होती.
हे ही वाचा:
पूर, दरडींनंतर महाडवासियांसमोर आता नवे संकट!
दगडफेक करणाऱ्या दहशतवाद्यांना दणका
नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट,नो पेट्रोल’
‘शर्ट बदलेपर्यंत घरे उभी राहिली’
नंतर सरकार किती प्रचंड वेगाने काम करत आहे, याचा दाखला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात दिला. महाविकास आघाडीच्या सरकारवर सातत्याने नाकर्तेपणाबद्दल टीका होत असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सरकार अत्यंत वेगाने काम करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्या ग्रामिण विकास खात्याच्या अंतर्गत ५ लाख घरे देण्यात आली. त्या देण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन गेल्या नोव्हेंबरमध्ये झाले आणि गेल्या महिन्यात त्याच घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला. तेव्हा मला एक योगायोग दिसला तो म्हणजे मी भूमिपूजनाला जो शर्ट घातला होता तोच शर्ट मी घराच्या चाव्या देतानाही घातला होता. तेव्हा मला आश्चर्य वाटले की, माझा शर्ट बदलायच्या आत तुम्ही घरे बांधलीत? म्हणजे पाहा किती वेगाने हे सरकार काम करते आहे ते!