विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचे वक्तव्य
गेले तीन दिवस आपण देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहोत आणि आज मुख्यमंत्रीही इथेच दौऱ्यावर आहेत. पण राज्यातील पूरग्रस्तांना तातडीची मदत दिलीच पाहिजे. यावर कायमस्वरूपी उपाय लवकरात लवकरत काढला तरच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा सार्थकी लागेल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांनी लगावला.
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते फडणवीस आणि दरेकर यांच्या दौऱ्याची माहिती उद्धव ठाकरेंना मिळताच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी तिथेच थांबण्याचा निरोप पाठवला. पूरग्रस्तांना तातडीची मदत तर दिलीच पाहिजे, मात्र यावर कायमस्वरूपी उपाय काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
यावर माध्यमांसोबत बोलताना दरेकर पुढे म्हणाले की, देवेंद्रजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता आल्यावर विरोधी पक्षाकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत, असे चित्र दिसून आले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी २०१९ मध्ये जो शासन निर्णय काढला होता. जे निर्णय त्यावेळी घेतले होते ते या सरकारने देखील घ्यावे, अशा जनतेच्या अपेक्षा आहेत.
हे ही वाचा:
निंदनीय !! पाकिस्तानात बकरीवर बलात्कार करून हत्या
मेरी कोम कशी आणि का पराभूत झाली?
वीजबिल माफीवर सवाल केला आणि साहेबांचा मूड गेला
पूरग्रस्त भागांची वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूया, असा फोन उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करून शाहुपुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याभागात एकत्र पाहणी झाली. लोकांचा आक्रोश आहे तो कमी करण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री करतील अशी अपेक्षा आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
दरेकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याला पुराने वेढले आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांना राहण्यासाठी आता जागा नसून राज्यकर्ते कोणीही असूदे पूरग्रस्तांना त्वरित मदत झाली पाहिजे हा या दौऱ्यामागचा उद्देश आहे. मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत हे चांगले आहे पण पूरग्रस्तांना तातडीची मदत दिली पाहिजे, मात्र यावर कायमस्वरूपी उपाय काढावा तरच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा सार्थकी लागेल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.