28 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरविशेषएसटीच्या बसेसवर फवारणीची उधळपट्टी...वाचा, किती होणार खर्च?

एसटीच्या बसेसवर फवारणीची उधळपट्टी…वाचा, किती होणार खर्च?

Google News Follow

Related

एसटी महामंडळाची स्थिती दिवसेंदिवस खस्ता होत चालली आहे, असे म्हटले जात असले तरी त्यावर अवास्तव खर्च करण्याची खुमखुमी काही कमी होत नाही.

आता राज्यातील १७ हजाराच्या वर असलेल्या एसटी बसेसवर विशेष रसायनांची फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक बसपाठी जवळपास ९५०० रुपये इतका खर्च या फवारणीसाठी येणार आहे. हा खर्च जवळपास १७ कोटींच्या आसपास जाईल.  त्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा अंदाज बांधला जात आहे. पण प्रत्यक्षात पावसाळ्यात या फवारणीचा नेमका फायदा काय होणार, असाही सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुख २ ऑगस्टला ईडीसमोर हजर होणार?

महापुरामुळे चिपळूणला बसला मोठा फटका; किती झाले नुकसान?

शिल्पा शेट्टीला न्यायालयाची चपराक

पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

विषाणू मारण्यासाठी अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग म्हणून हे रसायन फवारण्यात येणार आहे. एसटीच्या प्रवासी बसेसमध्ये आतून व बाहेरून ही फवारणी केली जाणार आहे. सहा महिने हे कोटिंग राहू शकते असा दावा करण्यात येत आहे. अर्थात, सहा महिन्यांपर्यंत या बसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा विषाणू तग धरू शकणार नाही, असा दावा त्यामागे आहे. येत्या आठवड्यात ही फवारणी सुरू करण्यात येईल. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली आहे. संबंधित कंत्राटदाराला काम सोपविण्यात आले आहे. पण पावसाळ्याच्या दिवसांत या रसायनांच्या फवारणीचे काय होणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे. गेल्या वर्षी या प्रकारच्या फवारणीचा निश्चितच उपयोग होऊ शकला असता कारण तेव्हा स्पर्शामुळे, संपर्कामुळे कोरोना पसरण्याची शक्यता अधिक होती. पण आता ही शक्यता या वर्षी नाही. त्यामुळे एवढा खर्च नेमका कशासाठी केला जाणार आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच एसटीचा कारभार गेल्या काही वर्षांत डबघाईला आलेला असताना आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार देणेही मुश्कील बनले असताना आता हा नवा खर्च एसटीच्या माथी बसणार आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा