भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये होणारा ‘इंद्र नेव्ही २१’ हा नौदलाचा संयुक्त सागरी सराव कार्यक्रम २८ आणि २९ जुलै या दोन दिवसात पार पडला. बाल्टिक समुद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमात आयएनएस तबर या युद्धनौकेने भारताचे प्रतिनिधित्व करताना सहभाग नोंदवला होता.
काही दिवसांपूर्वी रशियाच्या ३२५ व्या नौदल दिनानिमित्त झालेल्या समारंभात आयएनएस तबर ही भारताची युद्धनौका सहभागी झाली होती. त्यासाठी या युद्धनौकेने रशियातील सेंट पिट्सबर्ग याठिकाणी सदिच्छा भेट दिली होती. तर पुढे याच युद्धनौकेने भारताचे प्रतिनिधित्व इंद्र २१ या द्विपक्षीय संयुक्त सागरी सराव कार्यक्रमात केले. या सराव कार्यक्रमात रशियाकडून बाल्टिक ताफ्यातील आरएफएस झेलियोनी डोल आणि आरएफएस ओडीन्ट्सोव्हो ही संरक्षक जहाजे सहभागी झाली होती.
हे ही वाचा:
व्वा! जवळपास ३००० लोकांना लागणार ‘लॉटरी’
…असा मिळाला सचिनला त्याचा नवा पार्टनर!
वरळी कोळीवाड्याच्या किनाऱ्यालगत सुसज्ज अनधिकृत घरे…
हा सराव दोन दिवस सुरु होता आणि त्यात हवाई-हल्लाविरोधी, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विविध मोहिमा, नौकांवर विमाने उतरविण्याचा सराव आणि सागरी जहाजांच्या विविध कार्यांच्या सरावाचा समावेश होता.
भारत आणि रशिया या दोन देशांच्या सैन्यांमध्ये संयुक्त सरावाचा इंद्र हा कार्यक्रम होत असतो. ऑगस्ट महिन्यामध्ये भूदलाचाही असाच संयुक्त सराव कार्यक्रम पार पडणार आहे. रशियामध्ये व्होल्गोग्राड या शहरात हा सराव पार पडेल. १ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट रोजी हा सराव होणार आहे. २००३ पासून इंद्र या संयुक्त सराव कार्यक्रमाची सुरुवात झाली असून हा द्वैवार्षिक कार्यक्रम असतो. यावर्षी या सराव कार्यक्रमाचे हे बारावे वर्ष आहे.