श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियावरील कोरोनाचा विळखा आता आणखी वाढत आहे. कृणाल पंड्यापाठोपाठ आता टीम इंडियाच्या आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. कृणाल पंड्यानंतर चहल आणि गौतम दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कृणाल पंड्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ज्या ८ खेळाडूंना क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. त्यामध्ये चहल आणि गौतम या दोघांचाही समावेश होता. सध्या चहल आणि गौतम क्वॉरंटाईन आहेत. दरम्यान, यापूर्वी २७ जुलै रोजी कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
COVID-19: Yuzvendra Chahal and K Gowtham test positive in Sri Lanka
Read @ANI Story | https://t.co/1wL0NKVvEF#YuzvendraChahal #KGowtham #Cricket pic.twitter.com/vqmUKzYA67
— ANI Digital (@ani_digital) July 30, 2021
चहल आणि के. गौतम या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर असं सांगितलं जात आहे की, दोघांचाही अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत ते कृणाल पंड्यासोबत श्रीलंकेतच राहणार आहेत. तसेच इतर सहा खेळाडू, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, मनीष पांडे आणि इशान किशन. हे सर्वजण आज भारतात परतण्यासाठी निघणार आहेत. ईएसपीएन क्रिकइंफोनं दिलेल्या माहितीनुसार, चहल आणि गौतम यांचा कोरोना अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला होता, पण शुक्रवारी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे.
हे ही वाचा:
फडणवीस-ठाकरे भेट का झाली? कुठे झाली?
मुलं जन्माला घाला आणि पैसे घ्या योजना
सीबीएसईचा बारावीचा निकाल आज, काय असणार वेळ?
एकाच महिन्यात एयरटेलचे नुकसान तर जिओचा फायदा?
भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळवण्यात येणार दुसरा टी-२० सामना स्थगित करण्यात आला होता. टीम इंडियाचा ऑलराउंडर क्रुणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याने हा सामना स्थगित करण्यात आला आहे. तसेच भारत आणि श्रीलंकेच्या संघानी आयसोलेट केलं होतं. बीसीसीआयनने ट्वीट करत याची माहिती दिली होती.