चीनच्या एका शहराने लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक मुलामागे रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतलाय. चीनमध्ये लोकसंख्या वेगाने घटत असून, आपला जन्मदर वाढवण्यासाठी संघर्ष करीत आहे. चिनी सिचुआनच्या नैर्ऋत्येकडील प्रांतातील पंझिहुआन शहरातल्या सरकारने बुधवारी मोठी घोषणा केली. पंझिहुआन प्रशासन स्थानिक कुटुंबीयांना प्रति मुलाच्या मागे दरमहा ५०० युआन (७७ डॉलर) देणार आहे. त्यामुळे मुलं जन्माला घाला आणि पैसे घ्या, अशी योजना चीनमध्ये सुरु झाली आहे.
अहवालानुसार, १.२ मिलियन लोकांचे शहर, जे स्टील उद्योगासाठी ओळखले जाते, स्थानिक घर नोंदणी असलेल्या मातांना मोफत प्रसूती सेवा देते आणि कामाच्या ठिकाणी जवळ अधिक नर्सरी शाळा बनवणार आहे. मे महिन्यातील सर्व विवाहित जोडप्यांना तीन मुले होण्याची परवानगी देण्याच्या निर्णयानंतर चीन सरकारने या महिन्याच्या सुरुवातीस २०२५ पर्यंत मुलाचा जन्म, पालकत्व आणि शिक्षण खर्चात मदत करण्याचे वचन दिले. या अहवालानुसार हे शहर पात्र ठरलेल्या योग्य संशोधक, शिक्षक, वैद्यकीय व्यावसायिक आणि उद्योजकांना रोख बोनस देणार आहे.
हे ही वाचा:
सीबीएसईचा बारावीचा निकाल आज, काय असणार वेळ?
एकाच महिन्यात एयरटेलचे नुकसान तर जिओचा फायदा?
शिवशाहीर बाबासाहेबांचा अद्भूत शिवमय प्रवास आता ऑडिओ स्वरूपात
कोविड-१९ मुळे सर्व देशभर असलेला अनिश्चिततेदरम्यान गेल्या वर्षी जवळजवळ सहा दशकांत चीनमधील जन्मदर हा नीचांकी पातळीवर गेला. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या अंदाजानुसार, २०२५ च्या आधी देशाची लोकसंख्या सध्या १.४१ अब्ज इतकी कमी होण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे. वाढत्या लोकसंख्येस आळा घालण्यासाठी काही वर्षांपूर्वी येथे कठोर नियम लागू करण्यात आले होते, त्यानंतर प्रजनन दरात मोठी कपात करण्यात आली होती. त्या सुधारण्यासाठी आता चिनी सरकार नागरिकांना जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे.