डेटिंग अप्लिकेशवर ओळख झालेल्या तरुणीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत बलात्कार केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी भारतातील एका प्रसिद्ध स्नॅक्स कंपनीच्या संचालकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली आहे.
अविन अग्रवाल असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. अविन अग्रवाल हा देशातील एका प्रसिद्ध स्नॅक्स कंपनीच्या संचालक मंडळावर संचालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी अविन अग्रवाल याची एक डेटिंग अप्लिकेशवर मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. पीडित तरुणीचा जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वाढदिवस झाला असे अविन याला कळले. त्याने वाढदिवसाची पार्टी देतो म्हणून वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक खोली बुक करून सोमवारी पीडित तरुणीला त्या ठिकाणी बोलावून घेतले.
त्यानंतर खोलीतच वाढदिवसाचा केक कापून त्याने तिचा वाढदिवस साजरा केला, त्यानंतर तिला रेड वाईन पिण्यासाठी दिली. रेड वाईन पिताच तिला झोपेची तंद्री जाणवू लागली, त्याचा गैरफायदा घेत अविन याने तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर आपल्यासोबत काहीतरी वाईट घटना घडली याची जाणीव होताच ती त्याला जाब विचारणार त्याचवेळी दाराची वेळ वाजली. अविन हा दार उघडण्यासाठी गेला असता दारात त्याची प्रेयसी उभी होती. पीडित तरुणीला खोलीत बघताच प्रेयसीचा पार चढला आणि ती त्याच्यासोबत भांडू लागली. त्याच वेळी पीडित तरुणी खोलीबाहेर पडली आणि थेट घरी आली. झालेला प्रकार तिने आपल्या खोलीतील मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने पोलिसांना कळण्याचा सल्ला या पीडितेला दिला.
हे ही वाचा:
भारत आणि श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ मुकाबला
नव्या शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींनी हे सांगितलं
गोंधळी खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करा
खुशखबर!! ओबीसींसाठी इथे असतील २७ टक्के जागा…
तिने ताबडतोब १०० नंबरवर फोन लावून पोलिसांना बोलावून घेतले. वर्सोवा पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणून अविन अग्रवाल याच्याविरुद्ध बलात्कार, गुंगीचे औषध पाजले प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी हा गुन्हा वरळी पोलीसाकडे पाठवण्यात आला आहे. वरळी पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून आरोपीच्या शोधासाठी एक पथक त्याच्या मागावर पाठवण्यात आले असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली आहे.