शेअर मार्केटमधील बिग बुल अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी आता एव्हिएशन क्षेत्रात उतरण्याची तयारी केली आहे. भारतामध्ये येत्या काळात लो कॉस्ट विमानसेवा सुरु करण्यासाठी ते ३५ मिलियन डॉलर्सची म्हणजेच २.८ अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या चार वर्षात ७० विमाने खरेदी करण्याची योजना तयार केली आहे. यामुळे भारतीयांना पुन्हा एकदा स्वस्तात प्रवास करता येणार आहे.
ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार येत्या चार वर्षात राकेश झुनझुनवाला आपल्या या विमान कंपनीसाठी ७० विमाने खरेदी करणार आहेत. भारतीय लोकांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा यासाठी राकेश झुनझुनवाला विमान सेवा सुरु करणार असल्याचं सांगण्यात येतंय.
ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं की, या नवीन विमान कंपनीसाठी ते ३.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून एयरलाईन्स कंपनीमध्ये राकेश झुनझुनवाला ४० टक्के शेअर्स आपल्याकडे ठेवणार आहेत. येत्या १५ ते २० दिवसांमध्ये सेंट्रल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून या विमान सेवा कंपनीला एनओसी मिळेल असंही त्यांनी सांगितलं.
राकेश झुनझुनवाला यांच्या विमान सेवा कंपनीचे नाव अकासा एयर असं असणार आहे. या नवीन एयरलाईन्समध्ये डेल्टा एयरलाईन्सचे पूर्वीचे सीनियर एक्झिक्युटिव्ह आणि त्यांची टीम काम करणार आहे. एकाच वेळी १८० लोक विमानाचा प्रवास करु शकतील अशा पद्धतीच्या विमानांची या कंपनीकडून चाचपणी होत आहे.
हे ही वाचा:
पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा
‘ही’ अट मान्य केली, तर टेस्लाच्या गाड्या स्वस्त होणार
सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं शंभरीत पदार्पण
भारताचे वॉरेन बफे अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्यासारख्या शेअर बाजारातील दिग्गजांच्या रणनितीवर सामान्य गुंतवणूकदारांची नजर असते. अनेक गुंतवणूकदार त्यांना फॉलो करतात. जगभरातील विमान सेवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसला असून गेल्या दोन वर्षांपासून त्या बंद आहेत. अशा काळात राकेश झुनझुनवाला यांनी विमानसेवेमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे.