27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरराजकारणलाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला

लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला

Google News Follow

Related

“लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला.” असं ट्विट करत निलेश राणे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सर्व विचार करून दरडग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करू. असं विधान वडेट्टीवारांनी केलं होतं. त्यांच्या याच विधानाचा निलेश राणेंनी समाचार घेतला आहे.

“लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला. विचार करेपर्यंत लोकं मेली तरी चालतील, यावरून कळतं या हलकट सरकारला महाराष्ट्राच्या लोकांची किती काळजी आहे. इतका नीच तर हिंदी पिक्चर मधला कुठला विल्हन देखील नसेल जितकं नीच ठाकरे सरकार लोकांशी वागत आहे.” असं ट्विट करत निलेश राणेंनी वडेट्टीवार आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राज्य सरकारकडून आज दरड दुर्घटनाग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत काही निकष ठरवून आज पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व विचार करून दरडग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करू, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

हे ही वाचा:

येडियुरप्पांचे कार्य शब्दात व्यक्त करण्यापेक्षाही मोठे

भारताची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा कोरोनाचे संकट

शी जिनपिंगची तिबेट भेट हा भारताला इशारा?

देशासाठी मेडल जिंकलं तरच आम्ही भारतीय ठरतो

चिपळूण, कोल्हापूर, सांगली या सर्व भागात पूरस्थितीने लोकांची घरं उध्वस्त झाली आहेत. अनेकांचं उपजीविकेचं साधनही वाहून गेलं आहे. पण तरीही ठाकरे सरकारने पूरग्रस्तांसाठी अद्याप कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. अरे,सगळे तुम्ही नेते एकाच छताखालचे आहेत एकमेकांची उणीधुनी काढता आणि संध्याकाळी एकाच बाटलीत उतरता तुम्हा सर्वांना जनतेची काही चिंता नाही कोणताही पक्ष असता तर आम्हा जनतेचा विचार काही केला नसता फक्त चिखल फेक करीत राहिले असते

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा