अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि १९६० च्या दशकातील भारतीय क्रीडा क्षेत्राचे हीरो असलेले नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. पुण्यात वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. १९६१ मध्ये सुरु झालेला अर्जुन पुरस्कार पहिल्यांदा प्राप्त करण्याचा मान नंदू नाटेकर यांना मिळाला होता.
नंदू नाटेकर हे मूळचे सांगलीचे होते. मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. बॅडमिंटन क्रिडाप्रकारात त्यांनी भाराताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवलं. भारतासाठी पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे ते बॅडमिंटनपटू होते. तसेच भारत सरकारच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिले क्रीडापटू होते. बॅडमिंटनप्रमाणे त्यांनी इतर खेळातही प्राविण्य मिळवलं होतं. क्रिकेट, टेनिस या क्रिडाप्रकारांतही त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजवल्या होत्या.
१९५४ मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. परंतु यानंतर त्यांनी बहारदार खेळाने बॅडमिंटन रसिकांना आनंद दिला. १९८० आणि १९८१ मध्ये दुहेरी पदक जिंकलं. १९५१ ते १९६३ दरम्यान झालेल्या १६ एकेरी सामन्यांपैकी १२ आणि डबल्समध्ये १६ पैकी ८ त्यांनी जिंकले. थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचे सदस्य होते.
हे ही वाचा:
काय आहे भारत-रशिया दरम्यानचा इंद्र-२१ युद्ध सराव?
बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! शपथविधीचाही ठरला मुहूर्त
…म्हणून गुजरातमधील शहराला मिळाला ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ चा दर्जा
भास्कर जाधव यांनी पुराचे खापर फोडायला शोधली डोकी
१५ वर्षांच्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात १७ राष्ट्रीय विजेतेपदांचा समावेश आहे. १९५४ मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.