31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणराज्यपाल भगतसिंग कोश्यारी तळियेला जाणार

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तळियेला जाणार

Google News Follow

Related

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार हेही आहेत. पावसाचा तडाखा बसलेल्या चिपळूण आणि महाडमधील दरडग्रस्त तळीये गावाच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कोश्यारी करतील. “पुराचा फटका बसलेल्या कोकणातील महाड, तळये, चिपळूण या भागाचा पाहणी दौरा आज मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी करीत असून त्यांच्या सोबत आज मलाही या दौऱ्यात सहभागी होऊन परिस्थितीची दाहकता समजून घेण्याची संधी मिळाली आहे.” असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर जलमय झालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी चिपळूण दौरा केला. त्यानंतर आता राज्यपालही चिपळूणला जात आहेत. त्यासोबतच दरड कोसळून गिळंकृत झालेल्या तळीये गावाचीही पाहणी कोश्यारी करणार आहेत.

अतिवृष्टीमुळे कोकणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळीये गावात आतापर्यंत ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेल्याने त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची नितांत गरज निर्माण झाली आहे.

पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३५ घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले ३२ मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत ५३ मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही ३२ नागरिक बेपत्ता आहेत.

हे ही वाचा:

लोकहित जोपासण्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही

पुन्हा एकदा मोदी हटाओचे अपयशी प्रयत्न सुरु

आसाम-मिझोराम सीमासंघर्षाला हिंसक वळण

महिला भिकारणीला फेकले स्कायवॉकवरून 

दरम्यान, महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा, तेथील सोयी-सुविधांसाठी नियोजन करा, उद्योजकांची देखील मदत घ्या. गावकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघा, तसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगर उतारांवरील वाड्या आणि वस्त्या ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाड्या-वस्त्यांचे कशा पद्धतीने पुनर्वसन करता येईल, यावर निश्चित असा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा