मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त सातारा जिल्ह्याला भेट देऊन पाहणी करणार होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरातून माघारी फिरलं आहे. सातारा आणि कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आणि खराब हवामान यामुळे कोयनानगरातील हेलिपॅडवर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हे हेलिकॉप्टर पुणे विमानतळाकडे माघारी फिरलं. आधीच अनेक दिवस घरी बसून असल्याची टीका होत असताना, आता पुन्हा उद्धव ठाकरे पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊ शकणार नाहीत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यावरुन सकाळी ११ च्या सुमारास कोयनानगरकडे रवाना झालं. ११:३० वाजता ते कोयनानगर हेलिपॅडवर पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे हे हेलिकॉप्टर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर पुण्यात परतलं.
काल मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि चिपळूणमध्ये पुराची पाहणी करण्यासाठी दौरा केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भोवती सुरक्षारक्षकांचं कवच तयार करण्यात आलं होतं. अशावेळी भास्कर जाधव हे स्थानिकांशी आणि पूरग्रस्तांशी अरेरावीने आणि मुजोरपणे बोलताना आढळले होते. एका पूरग्रस्त महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत मदतीसाठी हात पसरले होते. त्यावेळी भास्कर जाधव यांनी त्या महिलेच्या मुलालाच ‘आईला सावर’ असे सांगितले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल २५ जुलैला चिपळूणचा तर २४ जुलैला रायगड जिल्ह्यातील तळीये दरडग्रस्त भागाचा दौरा केला. तळीये इथं दरड कोसळून ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
हे ही वाचा:
येडियुरप्पा अखेर पायउतार होणार
…आणि नवनीत राणांना अश्रू अनावर झाले
कारगिल हुतात्म्यांना देशवासियांकडून श्रद्धांजली
निकषांचा विचार न करता तातडीची मदत जाहीर करा