23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसंकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे कसले पालक मंत्री? हे तर पळपुटे मंत्री!

संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे कसले पालक मंत्री? हे तर पळपुटे मंत्री!

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. कोकणच्या एकूणच पूर परिस्थितीच्या अनुषंगाने चित्र वाघ सरकारवर कडाडल्या आहेत. यावेळी त्यांनी अनिल परब हे पळपुटे मंत्री असल्याचा घणाघात केला आहे.

बुधवार रात्रीपासून कोकणात पावसाचा तांडव सुरु आहे. पावसाने कोकणातली अनेक गावे ही पाण्याखाली गेली आहेत. या पावसाच्या हाहाकारामुळे कोकण पट्ट्यात अनेक प्रकारचे नुकसान झाले आहे. या साऱ्या पावसाचा चिपळूण भागाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. चिपळूणमध्ये १०-१२ फूट पाणी साचले असल्याचे पाहण्यात आले. ही सारी परिस्थिती इतकी भीषण होती की एनडीआरएफच्या तुकड्यांसह नौदलालाही पाठवण्यात आले.

हे ही वाचा:

लडाखमध्ये उभे राहणार केंद्रीय विश्वविद्यालय

श्रीलंकेने घेतली भारताची फिरकी

राष्ट्रपती भवन पुन्हा होणार पर्यटकांसाठी खुले

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

पण या सगळ्या परिस्थितीत राज्य सरकारचा मात्र ढिसाळ कारभार दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी कोकणातील परिस्थिती नियंत्रणात आलेली नसतानाही जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे. अनिल परब हे रातोरात मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावरून परब यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी परब यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून तोफ डागली आहे. “आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात” असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे. तर असे करणारे अनिल परब हे पळपुटे मंत्री असल्याचेही त्या म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा