23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषचिपळूणमध्ये ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू

चिपळूणमध्ये ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू

Google News Follow

Related

पुराचा फटका कोविडलाही

पावसाच्या थैमानामुळे निर्माण झालेली महाराष्ट्रावरील संकटाची मालिका थांबताना दिसत नाही. चिपळूणमध्ये दरडी कोसळून ३८ लोक दगावल्याची घटना ताजी असतानाच कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोकणात सध्या कोविडचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात आहे. अशात पुरामुळे कोरोनाची स्थिती देखील बिकट केली आहे.

गेल्या चार दिवसांपासून कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोकणात अनेक भागात पूर आला आहे. चिपळूणमधील कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमध्येही काल संध्याकाळी पाण्याचा मोठा लोट आला. त्यामुळे संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी आणि चिखल झाला. त्यामुळे या कोविड सेंटरमधील वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या ८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

तुमच्या तिजोरीची किल्ली हरवली, भ्रष्टाचार करायला ही किल्ली रात्रीच सापडते

आधीच लॉकडाऊन, त्यात पावसानेही झोडपलं

रायगडमध्ये दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू

सांगली, कोल्हापूरमध्ये २०१९ची पुनरावृत्ती होणार?

चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्याने संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी झाले. त्यामुळे स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन रुग्णांना पटापट बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. मात्र, कंबरेभर पाणी, अंधार यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. या कोविड सेंटरमध्ये जनरेटर होते. पण कुणालाही जनरेटर चालू कसं करायचं माहीत नव्हतं. त्यामुळे कोविड सेंटरमधला वीज पुरवठा सुरू होऊ शकला नाही. परिणामी व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा