27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषडोंगरउतारावरील झोपड्यांवर सर्वाधिक धोक्याचे सावट

डोंगरउतारावरील झोपड्यांवर सर्वाधिक धोक्याचे सावट

Google News Follow

Related

मुंबईत रविवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसात चेंबूर व विक्रोळी येथे दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी गेला आणि पुन्हा एकदा शहरांतील डोंगरउतारांवरील झोपडपट्टय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत एकूण २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असून त्यापैकी तब्बल २१९ ठिकाणे ही केवळ पूर्व उपनगरांतील असल्याचे आता समोर आलेले आहे.

मुंबई शहरामध्ये ग्रॅण्ट रोड, मलबार हिल, ताडदेव, नेपियन्सी रोडचा भाग असलेल्या डी विभागात सर्वाधिक टेकडय़ा आहेत. नेपियन्सी मार्गालगतच्या परिसरातील आशानगर झोपडपट्टी, फोर्जेट हिल, चंदुलाल धोबीघाटच्या पाठीमागील भाग, ब्रीच कॅण्डी रुग्णालयाजवळ भुलाबाई देसाई मार्गालगतचा भाग, एम. पी. मिल कम्पाऊंडचा मागील भाग, बाबुलनाथ परिसरातील काही भाग, दादीशेठ लेनचा परिसर अशा ठिकाणी दरडींवर घरे आहेत किंवा टेकडीचा भाग आहे.

महापालिकेतील शिवसेनेच्या सत्ताकाळात मुंबईची ही अवस्था झाल्याची टीका होऊ लागली आहे. अजूनही अनेकांचे जीव धोक्यात आहेत. सध्याच्या घडीला तब्बल २२ हजार ४८३ कुटुंबांचा जीव धोक्यात असून, २५ वर्षांच्या सत्ताधाऱ्यांनी हेच ‘करून दाखवलं’ असेच आता म्हणावे लागेल. मुंबईमध्ये दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्तहानी प्रशासनाला नवीन नसून, मागील १० वर्षांपासून दरडी कोसळत आहेत. या दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही हेच दिसून आलेले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री मंत्रालयात…या बातमीसाठी शेकडो बळी जावे लागले!

ऑलिंपिकच्या बोधवाक्यात १२७ वर्षांनी बदल

राज्याला ड्रायव्हर नको तर लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा

रायगडमध्ये दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू

पावसाळ्यात अनेकदा दरड कोसळून नागरिकांचा मृत्यू होतो. अशा घटना वारंवार घडतात. त्यापैकी डोंगर उतारांवरील सर्वाधिक वसाहती पूर्व उपनगरांमधील भांडुप, विक्रोळी, विद्याविहार, घाटकोपर, कुर्ला या परिसरांत आहेत. चेंबूरचा लाल डोंगर असो वा घाटकोपरचे रामजी नगर, खंडोबा टेकडी, राम नगर, वर्षा नगर, विक्रोळीचे सुर्यानगर, भांडुपचे टेम्भी पाडा असे अनेक डोंगराळ भाग आज प्रचंड झोपड्यांनी आच्छादून गेले आहेत. दाट जंगलांच्या जागी झालेले सिमेंटचे जंगल बकाल वस्त्यांमध्ये रुपांतर झालेले आहे. मुख्य म्हणजे, या ठिकाणी झोपडी माफिया चाळींचे एकएक मजले वर चढवत आहेत. परंतु पालिका प्रशासन मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा