गुरुवारी सकाळी आयकर विभागाने दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापे मारले आहेत. कर चोरी केल्याच्या संशयावरून हे छापे मारण्यात आले आहेत. दैनिक भास्कर समूहाच्या देशभरातील विविध ठिकाणच्या कार्यालयांवर धाड टाकून हा आयकर विभागाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
गुरुवार, २२ जुलै रोजी सकाळी ५ वाजल्यापासूनच दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापा टाकत आयकर विभागाच्या कारवाईला सुरुवात झाली. दैनिक भास्कर समूहाच्या इंदोर आणि भोपाळ येथील कार्यालयापासून याची सुरूवात झाल्याचे समजते. तर या सोबतच महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली येथील कार्यालयांवरही तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दैनिक भास्कर समूहाच्या मालकांच्या घरावरही आयकर विभागाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या घरी आयकर विभागाचे एक पथक उपस्थित आहे. या पथकाद्वारे विविध प्रकारच्या कागदपत्रांची छाननी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे ही कारवाई सुरू असताना यांच्या घरा बाहेर केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे म्हणजेच सीआरपीएफचे जवान उपस्थित असल्याचे समजते.
हे ही वाचा:
चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार
चीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित
चीनमध्ये पुरामुळे २५ पेक्षा जास्त मृत्यू
आमच्यावर किमान ‘ही’ वेळ आलेली नाही, येणारही नाही
दैनिक भास्कर समूह हा देशातील एक मोठा माध्यम समूह आहे. देशभरात प्रामुख्याने हिंदी, मराठी आणि गुजराती या तीन भाषांमध्ये त्यांची एकूण ६५ प्रकारची विविध प्रकाशने आहेत.