24 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारण‘विस्मरणा’मुळे संजय राऊत झाले निःशब्द!

‘विस्मरणा’मुळे संजय राऊत झाले निःशब्द!

Google News Follow

Related

देशात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झालेला नाही, असे केंद्र सरकारने संसदेत उत्तर दिल्यानंतर निःशब्द झाल्याचे सांगणारे खासदार संजय राऊत विस्मरणामुळेच अवाक झाले असावेत. कारण, महाराष्ट्रातील ठाकरे सरकारनेच प्रतिज्ञापत्राद्वारे राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याची कबुली दोन महिन्यांपूर्वी न्यायालयात दिली होती, हे त्यांना बहुधा लक्षात नसावे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी संजय राऊत यांना ही आठवण करून दिली.

पात्रा यांनी म्हटले आहे की, कुणाचाही मृत्यू झाला तर त्यावर धक्का बसलाच पाहिजे. पण खोट्या गोष्टींच्या आधारावर जर राजकारण केले जात असेल तर त्याचा धक्का आम्हालाच बसला आहे. कारण महाराष्ट्र सरकारने जे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते, त्यातच म्हटले आहे की, एकाही व्यक्तीचा मृत्यू राज्यात ऑक्सिजनअभावी झालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर महाविकास आघाडी सरकारने हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टीका केली आहे की, मे महिन्यात ठाकरे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते की राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही. केंद्राचे अहवाल राज्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच बनतात. केंद्राने ठाकरे सरकारच्या माहितीच्या आधारे तसाच अहवाल बनवला. या अहवालाने म्हणे संजय राऊत यांना धक्का बसला. निर्लज्जपणालाही मर्यादा असतात. ठाकरे सरकारने न्यायालयात केलेले खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवत जा. मग असे धक्के बसणार नाहीत. राऊत आता लोकांना केंद्र सरकारविरुद्ध केस दाखल करायला सांगतायत. मग आता तोच न्याय स्वतःलाही लावा.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झालेला नाही, असे उत्तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्यानंतर संजय राऊत यांनी अवाक झाल्याची प्रतिक्रिया दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा