27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषदिल्लीवर ड्रोन अटॅकचे संकट

दिल्लीवर ड्रोन अटॅकचे संकट

Google News Follow

Related

स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना रेड अलर्ट जारी केला आहे. एजन्सींना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीत मोठा दहशतवादी कट रचण्याचा विचार करीत आहेत. काही दिवसांपूर्वी जम्मूच्या लष्करी तळावर अशाच पद्धतीने ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. आता एजन्सींनी याबाबत दिल्ली पोलिसांना सतर्क केले आहे.

सुरक्षा एजन्सीने इशारा दिला आहे की १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतातय विशेषत: ५ ऑगस्टला. कारण, याच दिवशी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० काढले होते.

एकीकडे एजन्सींने इशारा दिला असताना, दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही ड्रोन हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दिल्ली पोलिस आणि इतर राज्यांतील पोलिसांना ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात दोन स्तरांचे प्रशिक्षण आहे.

पहिल्या प्रशिक्षणात सॉफ्ट किल आहे, ज्या अंतर्गत सामान्य ड्रोन पाहिल्यास कारवाई कशी करावी हे शिकवले गेले आहे. हार्ड किल असे दुसर्‍या प्रशिक्षणाचे नाव आहे, म्हणजे जर एखादे संशयास्पद ड्रोन किंवा उड्डाण करणारे उपकरण दिसले तर त्यावर कारवाई कशी करावी.

नुकतेच दिल्लीचे पोलिस आयुक्त बालाजी श्रीवास्तव यांनीही उड्डाण करणारे हवाई परिवहन आणि ड्रोनसारख्या गोष्टींबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. जम्मू एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हे ही वाचा:

मणिपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्षच भाजपाच्या वाटेवर?

मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे

३४ जणांचा जीव जाऊनही महानगरपालिका २ वर्षांपासून सुस्त

मुलगा केंद्रीय मंत्री; पण आईवडील शेतात समाधानी

स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी सुरु असताना दिल्ली पोलिसांनी उड्डाण करणाऱ्या सर्व उपकरणांवर बंदी घातली आहे. असामाजिक घटक आणि दहशतवाद्यांची धमकी लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अशी माहिती आहे की दहशतवादी उडणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून सामान्य जनता, व्हीआयपी आणि मोठ्या महत्वाच्या इमारतींना लक्ष्य करू शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा