27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरक्राईमनामाकुंद्रा व सहकाऱ्याला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

कुंद्रा व सहकाऱ्याला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

Google News Follow

Related

अश्लिल चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थॉर्प यांना २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश किलो कोर्टाने दिले आहेत.

सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती कुंद्रा याला सोमवारी रात्री पोलिसांनी या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी त्याच्या सहकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांचे व्हॉट्सअप चॅटही पोलिसांना सापडले आहे. त्यावरून या चित्रपटांबाबतच्या व्यवहाराचा तपशील उघड झाला आहे.

हे ही वाचा:

भारत आजच मालिका जिंकणार?

कुंद्रा प्रकरणी आणखी एकाला अटक; व्हॉट्सअप चॅट उघड

भारताला ऑलिंपिकमध्ये २१ पदकांची अपेक्षा

मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे

लंडनहून हे अश्लिल व्हीडिओ अपलोड करणारा प्रदीप बक्षी सध्या फरार आहे. गुन्हे अन्वेषण शाखेने न्यायालयात ही माहिती दिली. तो कुंद्राचा नातेवाईक असल्याचा दावाही पोलिसांनी न्यायालयासमोर केला आहे. पोलिसांनी असेही म्हटले की, या गुन्ह्यात बराचसा व्यवहार परदेशात झालेला असल्यामुळे ते तपासण्यासाठी कोठडीची गरज आहे. कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीशिवाय आमचा तपास पूर्ण होणार नाही. गहना वशिष्ठ आणि वंदना तिवारी यांच्यासोबत कुंद्रा यांच्या कंपनीने जे कॉन्ट्रॅक्ट केले होते ते आम्हाला पडताळायचे आहे. राज कुंद्रा या गुन्ह्यात मास्टरमाईड आहे. त्यानेच हा गोरखधंदा सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळवले.

कुंद्राचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, त्याची अटक बेकायदा आहे आणि पोलिसांनी त्याला सीआरपीसीच्या ४१ अ खाली नोटीस न देता पोलिसांनी अटक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशी अटक करणे योग्य नव्हते. पोलिस आणि कुंद्राच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस रिमांड दिला. आता तीन दिवस त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात त्याला मुख्य आरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अशा अश्लिल चित्रपटांची निर्मिती आणि काही अपच्या माध्यमातून त्यांचे प्रदर्शन करण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा