मंगळवार, २० जुलै रोजी भारतीय क्रिकेट संघ हा मालिका विजयाचे लक्ष्य ठेवून श्रीलंकेसमोर मैदानात उतरणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिला सामना सहजरीत्या जिंकला आहे. त्यामुळे आता जर मंगळवारचा दुसरा सामना भारताने जिंकला तर संघाच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघ खेळण्यासाठी मैदानात उतरेल.
शिखर धवन याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका काबिज करायला गेला आहे. १८ जुलैपासून या मालिकेला सुरुवात झाली असून आज या मालिकेचा दुसरा सामना खेळला जाणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे आर.प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून या सामन्याचा आनंद क्रिकेट रसिकांना लुटता येणार आहे.
हे ही वाचा:
३४ जणांचा जीव जाऊनही महानगरपालिका २ वर्षांपासून सुस्त
मुलगा केंद्रीय मंत्री; पण आईवडील शेतात समाधानी
मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे
केरळमध्ये ईद साजरी करताना कोरोनाचा धोका नाही
मालिकेतील पहिला सामना सात गडी राखून जिंकत भारताने आधीच या मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वासही उंचावला असणार आहे. दुसरा सामना जिंकत मालिका खिशात टाकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ खेळणार असला तरीही हा सामना जिंकून बरोबरी साधण्यासाठी श्रीलंका संघही कंबर असेल.
श्रीलंकेने जिंकली नाणेफेक, प्रथम फलंदाजीचा निर्णय
या सामन्याच्या वेळी श्रीलंकेतील वातावरण ढगाळ असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर खेळपट्टी ही फलंदाजीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यापेक्षा या सामन्यात अधिक धावा आणि फटकेबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजीसाठी पोषक अशा या खेळपट्टीवर श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्रीलंका संघ भारताला विजयासाठी काय लक्ष्य ठेवतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.