22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणमुलगा केंद्रीय मंत्री; पण आईवडील शेतात समाधानी

मुलगा केंद्रीय मंत्री; पण आईवडील शेतात समाधानी

Google News Follow

Related

याला म्हणतात साधेपणातले सुख! केंद्रीय मंत्री एल. मरूगन यांच्या मात्या पित्यांचा साधेपणाची सध्या जोरदार चर्चा आहे. मुलगा केंद्रीय मंत्री झाल्यावरही हे मायबाप आजही आपल्या शेतात राबताहेत. खरंतर केंद्रीय मंत्री झाल्यावर, रुबाब बदलायला हवा, पण तसूभरही या माता पित्यांच्या वागण्यात बदल झालेला नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणतात ते यालाच.

५९ वर्षीय वरुदाम्मल या आजही शेतात रोज राबतात.तणगवत काढणं तशीच शेतातील इतर कामे करणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले आहे. मरूगन यांचे वडील आजही त्याच नित्यनियमाने शेतात राबतात. दिवसभर काबाड कष्ट करताना कुठलीही लाज न बाळगता या दोघांनी मुलाच्या मंत्रीपदानंतर आपला नित्यक्रम बदलला नाही. म्हणूनच सध्या तामिळनाडूमध्ये या दोघांची चर्चा खूप रंगत आहे. मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असूनही, इतका साधेपणा अंगी असल्यामुळे या दोघा माता पित्यांचे कौतुक अवघ्या देशभरातून होत आहे.

हे ही वाचा:

अश्लिल चित्रपटनिर्मितीप्रकरणी राज कुंद्रा अटकेत

केरळमध्ये ईद साजरी करताना कोरोनाचा धोका नाही

लखनौ विद्यापीठात विद्यार्थी गिरवणार सावरकरांच्या विचारांचे धडे

दशावतारी कलाकारांचे दुर्दैवाचे दशावतार थांबवा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात नुकतेच एल. मरुगन यांनी संधी मिळाली. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळाले. त्यातलाच एक चेहरा म्हणजे एल. मरुगन यांचा. मोठ्या संघर्षानंतरच मरुगन आता सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात दाखल झाले आहेत. परंतु तामिळनाडूतील कोनूर गावात राहणारे मरुगन यांचे माता पिता मात्र अजिबात बदलले नाहीत.

आजही शेतात मजूर म्हणून राबताना त्यांना कुठलेही किंतु परंतु वाटत नाही. नामक्कलमध्ये राहणारे त्यांचे आई-वडिल शेतात काम करत असतानाच, मुलाच्या मंत्रीपदाची वार्ता कानावर पडली. तरीही कुठलाही आवेश न दाखवता एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे ते कामात मग्न राहिले. हेच खरे या माणसांचे साधेपण आहे. टाइम्स वृत्तपत्राचे प्रतिनिधी भेटायला गेले असता, मुरुगन यांचे आईवडिल शेतात काम करत होते.

तिथूनही ते परवानगी घेऊन पत्रकाराशी संवाद साधण्यासाठी आले. मुरुगन यांच्या शिक्षणाविषयी भरभरून बोलताना आई वडिल मित्रांकडून पैसे घेऊन मुलाचे शिक्षण पूर्ण केल्याचे सांगतात. मुलाचे यश पाहताना आई वडिल भरभरून बोलतात. पण हे करत असताना, आई वडिलांनी स्वतःचा साधेपणा आणि कामसुवृत्ती तसुभरही कमी होऊ दिली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा