राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची टीका गेल्या दीड वर्षात अनेकवेळा झाली आहे. आता त्यात दिवसाढवळ्या तलवारीने केल्या गेलेल्या हल्ल्याच्या घटनांची भर पडत आहे. वादग्रस्त जमिनीची केस लढत असल्याच्या रागातून वकीलावर भरदिवसा भररस्त्यात तलवारीने हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी दुपारी दहिसर पश्चिम कंदारपाडा येथे घडली.
या हल्ल्यात वकील सत्यदेव जोशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी २०ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत
आरोप बिनबुडाचे! भारतात कोणाचीही हेरगिरी नाही
अमरिंदर विरुद्ध सिद्धू वाद चिघळणार?
खरंच, जीवितहानीसाठी शिवसेना सोडून बाकी सगळे जबाबदार
सत्यदेव जोशी असे हल्ल्यात जखमी झालेल्या वकिलाचे नाव आहे. सत्यदेव जोशी हे दहिसर कांदरपाडा येथील एका वादग्रस्त जमिनीबाबत आपल्या क्लायंटच्या वतीने न्यायालयात सूट फाईल करणार होते. त्यासाठी रविवारी दुपारी ती वादग्रस्त जमीन बघण्यासाठी त्या ठिकाणी आले असता २०ते २५ जणांच्या जमावाने सत्यदेव जोशी यांच्यावर तलवार, लोखंडी सळई, बांबूने मारहाण करून जखमी केले.
या हल्ल्यानंतर हल्लरखोरांनी तेथून पळ काढला, या हल्ल्याचे व्हिडीओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी वकील जोशी यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा कसून शोध घेण्यात येत आहे. मुंबई वकीलावर झालेल्या हल्ल्याचा वकील संघटनांनी निषेध केला असून मुंबई वाढत्या गुंडगिरीची चर्चा व्हायरल व्हिडीओ वरून रंगली आहे.