भारत-श्रीलंका एक दिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका या दोन संघा दरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. या सामन्यात यजमान श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या गोलंदाजांसमोर लवकरात लवकर श्रीलंका संघाला बाद करण्याचे आव्हान असणार आहे.
हे ही वाचा:
…पुरावा द्या, नाहीतर ५० कोटींचा दावा ठोकतो!
विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा
भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकेची एमएच-६०आर हेलिकॉप्टर्स दाखल
घरे पडल्याची बातमी कळताच मंगल प्रभात लोढा धावले
भारतीय क्रिकेट संघ युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार खेळाडूंना घेऊन कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच १८ जुलै रोजी खेळला जात आहे. खरंतर ही मालिका १३ जुलैपासून सुरू होणे अपेक्षित होते. पण या मालिकेलाही कोरोनाचा फटका बसला. श्रीलंका संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार पहिला सामना आज म्हणजेच रविवार १८ जुलै रोजी खेळवण्याचे निश्चित झाले. दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरूवात झाली आहे.
शिखर धवन च्या नेतृत्वात खेळणारे पहिल्या सामन्यातील ११ खेळाडू निश्चित झाले आहेत. यात उपकर्णधार भुवनेश्वर कुमार सह पृथ्वी शॉ, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे यांचा समावेश आहे. तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांचाही समावेश करण्यात आला आहे. सोबत दिपक चहर, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचा गोलंदाज म्हणून समावेश केला गेला आहे.