देशात सध्या चालू असलेल्या लसीकरण मोहिमेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडे ६६ कोटी कोविड डोसेसची मागणी नोंदवली आहे. सिरम इन्स्टिट्युटसोबतच भारत बायोटेककडे देखील कोविड लसींच्या मात्रेची मागणी नोंदवली आहे.
कोविडचा सामन करण्यासाठी लसीकरण मोहिम देशात मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. लसीकरण मोहिमेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने ६६ कोटी लस मात्रांचा ऑगस्ट आणि डिसेंबर दरम्यान पुरवठा करण्याची मागणी नोंदवली आहे. त्यासाठी भारत सरकारने १४,५०५.७५ कोटी रुपये देखील देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याबरोबरच २२ कोटी कोविड-१९ लस मात्रा खासगी क्षेत्रातील आरोग्य सुविधांना देण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू?
बालिका वधूच्या ‘दादी सा’ चे निधन
ठाकरे सरकार तरुणांना स्वप्निल लोणकरच्या मार्गावर लोटत आहे
कल्याण डोंबिवलीमध्ये बेकायदा बांधकामांचे पीक
पुढील पाच महिन्यांच्या कालावधीत सरकारचा ३७.५ कोटी कोविशिल्ड लसमात्रांचा आणि भारत बायोटेकच्या २८.५ कोटी लसमात्रांचा पुरवठा करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
नव्या लसमात्रांसाठी कोविशिल्डच्या एका मात्रेची किंमत २१५.२५ रुपये आहे तर कोवॅक्सिनच्या एका मात्रेची किंमत २२५.७५ रुपये आहे. यामध्ये वस्तु व सेवा कराचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
सरकार लसीकरण मोहिमेत आणखी काही लसींचा अंतर्भाव करत आहे. रशियाच्या स्पुतनिक लसीला भारतात परवानगी देण्यात आली आहे. त्याबरोबरच इतरही लसींना परवानगी देण्यात येणार आहे.