राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे मुंबईत निधन झाले. त्या बर्याच दिवसांपासून आजारी होत्या. २०२० मध्ये सुरेखा सिक्री यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. रिपोर्ट्सनुसार, आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्या आरोग्यातील गुंतागुंत वाढली होती. सिक्री या ७५ वर्षांच्या होत्या.
Mumbai: Three-time national award-winning veteran actress Surekha Sikri passes away following a cardiac arrest earlier this morning. She was 75 years old. pic.twitter.com/QSumOrKECb
— ANI (@ANI) July 16, 2021
सुरेखा सिक्री यांना २०१९ मध्ये ‘बधाई हो’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपटांमधील तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सुरेखा सिक्री यांना यापूर्वी नोव्हेंबर २०१८ मध्ये देखील ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यादरम्यान अभिनेत्रीला अर्धांगवायू झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान त्या खाली कोसळून पडली होती, त्यानंतर अभिनेत्रीची तब्येत हळूहळू सुधारत होती. मात्र, तरीही त्या जागीच अंथरुणाला खिळल्या होत्या. थिएटर, सिनेमा आणि नंतर छोट्या पडद्यावर खोलवर छाप पाडणारी सुरेखा सिक्री चाहत्यांच्या लाडक्या अभिनेत्री होत्या. चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केल्यावर सुरेखा यांना कलर्सची सीरियल ‘बालिका वधू’मधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. या शोमधील ‘दादी सा’च्या व्यक्तिरेखेने त्यांना नव्या उंचीवर नेले होते.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार तरुणांना स्वप्निल लोणकरच्या मार्गावर लोटत आहे
खडसे यांच्या जावयाला १९ जुलैपर्यंत कोठडी
बापरे! पनीरमध्ये दुधाऐवजी खाद्यतेल
कोरोना निर्बंधांमुळे गणेशोत्सव मंडळे वैतागली
सुरेखा सिक्री यांचे बालपण अल्मोरा आणि नैनिताल या ठिकाणी गेलं. त्यांचे वडील एअर फोर्ममध्ये होते तर आई या शिक्षिका होत्या. सुरेखा सिक्री यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला. सुरेखा सिक्री यांना 1989 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. सुरेखा सिक्री यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.