इंधनाचे दर उच्चांकी पातळी गाठत असताना देशाचे नवे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी महत्वाची पावलं उचलली आहेत. याकरता त्यांनी तेल उत्पादक राष्ट्रांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. हरदीपसिंग पुरी यांनी या विषयी ट्विट करून माहिती दिली आहे. “ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा पुरवठा करणाऱ्यांना स्थिरता, निश्चितता आणि व्यावहारिकता या भावनेसाठी यूएई आणि इतर मैत्रीपूर्ण देशांसमवेत जवळून काम करण्याची आमची इच्छा आहे.” असं ट्विट पुरी यांनी केलं.
Had a warm courtesy call with HE Dr. Sultan Ahmed Al Jaber, UAE Minister of Industry and Advanced Technology and MD & Group CEO of @AdnocGroup. Discussed ways and means to invigorate the vibrant bilateral strategic energy partnership between India and UAE.
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) July 14, 2021
आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींमध्ये वाढ तसेच मागणीत वाढ झाल्यामुळे भारतातील पेट्रोल आणि इंधनाच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठले आहेत. मे महिन्यात तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती खाली आल्यात. देशातील दीड डझनांहून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचे भाव वाढले आहेत.
“यूएईचे उद्योग व प्रगत तंत्रज्ञान मंत्री आणि अॅड्नोक ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुलतान अहमद अल जाबेर यांच्याशी फोनवर चर्चा झाली. आम्ही भारत आणि यूएईच्या डायनॅमिक द्विपक्षीय सामरिक ऊर्जा भागीदारीत नवीन ऊर्जा वापरण्याच्या मार्गांवर चर्चा केली.” असं पुरी यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा:
‘हर घर जल’…२३ महिन्यांत ४.५ घरांना नळ जोडणी
आयुर्वेद, होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने दिली खुशखबर…महागाई भत्त्यात वाढ
काश्मीरमधील गावात जेव्हा पहिल्यांदाच वीज पोहोचते…
आपल्या ऊर्जेच्या आवश्यकतेपैकी ८५ टक्के ऊर्जा भारतात आयात केली जाते. बराच काळ तेल उत्पादक देशांच्या गटाला त्यांचे उत्पादन कपात संपुष्टात आणण्यासाठी भारताने संपर्क साधला आहे. तेलाच्या किमती वाजवी पातळीवर आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.