ट्राइब्ज इंडिया या भारत सरकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि दालनांमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने विशेष राखी कलेक्शन घेऊन आले आहे. तर त्यासोबतच इतर आकर्षक भेटवस्तूही उपलब्ध आहेत. ट्राइब्ज इंडिया येथे आदिवासी उत्पादनांच्या आकर्षक आणि विस्तृत श्रेणीत उत्कृष्ट हस्तकलेच्या तसेच धातूच्या वस्तू, वस्त्रे आणि सेंद्रिय हर्बल उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या गोष्टी भेटवस्तू म्हणून लोकांच्या पसंतीस उतरतात.
यंदा ट्राइब्ज इंडिया कॅटलॉगमध्ये खास राखी विभाग तयार केला असून त्यात देशभरातील विविध आदिवासींनी हाताने बनविलेल्या राख्या, पूजेसाठी वापरले जाणारे धातूचे डबे आणि तोरण आदी सजावटीच्या वस्तू विकत घेता येऊ शकतात. तर या व्यतिरिक्त, ट्राइब्ज इंडिया मध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही सणासुदीसाठी कपड्यांसाठीचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. यात रंगीबेरंगी कुर्ते, सलवार, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्र शैलीतील जॅकेट्स, तसेच माहेश्वरी, चंदेरी, बाग, कंठा, भंडारा, तुसार, संभालपुरी आणि इकत इत्यादी प्रकारातील साड्या, कपडे ट्राइब्ज इंडिया दालनांमध्ये मध्ये तसेच संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
हे ही वाचा:
‘तुम्ही नव्या भारताचे प्रतिबिंब’…मोदींनी साधला ऑलिम्पिक खेळाडूंशी संवाद
प्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी
मुंब्र्यातील उर्दू वर्तमानपत्रांत फक्त गाझाच्या बातम्या छापल्या जातात काय?
आदिवासींच्या विविध वस्तू आणि उत्पादनांच्या विकास आणि विपणना द्वारे आदिवासींचे जीवनमान उंचावून त्यांचे सबलीकरण करण्याच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने ट्रायफेड ट्राइब्ज इंडिया आपल्या देशभरातील दालनांमधील विक्रीसाठी ठेवलेल्या विविधांगी व आकर्षक श्रेणीतील उत्पादनांची व्याप्ती वाढवत आहे. ट्राइब्ज इंडिया उपक्रमामुळे देशभरातील नागरिकांना आदिवासी बांधवांनी तयार केलेली उत्तम प्रतीची दर्जेदार उत्पादने उपलब्ध होत आहेत. तर आदिवासी बांधवांनाही आर्थिक उत्पन्न मिळून त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होत आहे.