जून २०२१ मध्ये चीनमधील तैशान येथील अणुऊर्जा प्रकल्पातील ५ इंधन रॉडस खराब झाले. इंधन रॉड्स खराब झाल्यावर आधी न्यूक्लियर रिऍक्टर बंद ना करता प्लांटच्या आजूबाजूची सुरक्षा वाढवण्यात आली. पुढील दोनच दिवसात चीनी अणू वैज्ञानिक आणि तैशान पासून जवळच असलेल्या हार्बिन विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांचा खून करण्यात आला. चीनी अणू वैज्ञानिकांच्या मृत्यूनंतर कम्युनिस्ट सरकार न्यूक्लियर लिकच्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे का? चीनमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद युरोपमध्ये का उमटू लागले आहेत? या सगळ्या प्रकारामुळे ब्रिटनला संभाव्य धोका कसा निर्माण झाला? अश्या या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा..