22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषकोरोनामुळे पंढरपुरातील उलाढाल थांबली

कोरोनामुळे पंढरपुरातील उलाढाल थांबली

Google News Follow

Related

विठ्ठल आपल्या महाराष्ट्राचे आद्य दैवत. या विठ्ठलाच्या दर्शनासाठी होत असलेली वारी म्हणजेच काहीशे वर्षांपूर्वीपासूनची परंपरा. कोरोनाकाळात गेल्या दीड वर्षांपासून या सावळ्याच्या दर्शनाला अनेक वारकरी मुकले आहेत. आता कोरोनामुळे येथील सगळी उलाढाल थांबली आहे. येथील व्यावसायिक आणि दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे

वारीच्या निमित्ताने बाजारपेठही फुललेली असते. त्यामुळे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर बहरते. रेल्वे, बसेसच्या उलाढालीसह खासगी वाहतूकदारांचा व्यवसायही तेजीत असतो. पंढरपुरातील निवासस्थाने, हॉटेलची उलाढालही या काळात मजबूत असते. वारकरी पंढरपूरात जमतात, त्यावेळी आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात होत असते. आता मात्र चित्र पूर्ण पालटले आहे.

हे ही वाचा:

महिलेला गंडा घालताना पोलिसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या

समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याचे काय करणार आहात?

मुलींच्या मोफत शिक्षणाचे काय झाले?

लाल माकडं आणि नव लिबरल डोंबारी

वारीच्या वाटेवरील आणि आसपासच्या गावांनाही वारकर्‍यांकडून खरेदी सेवांमुळे उत्पन्नाचे साधन होते. त्यामुळे वर्षाकाठी किमान ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होत असते. सद्यस्थितीला मात्र ही उलाढाल बंद झालेली आहे. दोन वर्षांत किमान हजार कोटी रुपयांच्या घरात उलाढाल असती. परंतु संपूर्ण अर्थचक्रच कोलमडले असून, अनेक छोटे मोठे व्यापारी डबघाईला आले आहेत. सध्या कोरोनामुळे वारीवर आलेले निर्बंध अनेक वारकरी वर्गासाठी डोकेदुखी ठरलेले आहेत.

निर्बंधाच्या पायात सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला लाखो वारकरी मुकले आहेत. मुखी विठुनामाचा गजर करणारे आवाज आता ऐकू येणार नाहीत. अनेक छोटे मोठे उद्योग वारीवर अवलंबून असतात. आज हे सर्व उद्योग मरणासन्न अवस्थेत आहेत. वारी मार्गावरील अनेक शहरे ही केवळ वारीच्या जोरावर आज आर्थिकदृष्ट्या सबळ झालेली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा