दहशतवाद्यांच्या घुसखोरीला पाकिस्तानची मदत मिळत असते हे वास्तव आहेच पण जम्मू काश्मीरमधील विविध क्षेत्रातील लोकही त्यांना छुपी मदत करत असल्याचे आता लक्षात येऊ लागले आहे. त्यातूनच आता दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ११ जणांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे. यात हिज्बुल मुजाहिदीनचा नेता सय्यद सलाउद्दीन आणि त्याची मुले तसेच दोन पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कारवाईमुळे हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, जर दहशतवाद्यांना मदत केलीत तर त्याचे असे गंभीर परिणाम होऊ शकतात.
या बडतर्फ केलेल्यांमध्ये चार जण अनंतनागचे, तीन बडगामचे तर बारामुल्ला, श्रीनगर, पुलवामा व कुपवाडा येथील प्रत्येकी एक जण आहे. हे कर्मचारी जम्मू-काश्मीर पोलिस, शिक्षण, कृषी, कौशल्य विकास, ऊर्जा आणि आरोग्य विभागातील आहेत. शेर ए काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील एका कर्मचाऱ्याचाही समावेश त्यात आहे.
सय्यद सलाउद्दीनेचे मुलगे सय्यद अहमद शकील व शाहीद युसूफ यांनाही या प्रकरणात बडतर्फ करण्यात आले आहे. त्यातील एक जण मेडिकल सायन्सेसमध्ये तर एक शिक्षण विभागात नोकरीस होता. त्यांनी दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हवालाच्या माध्यमातून हिजबुल मुजाहिदीनसाठी पैसा उभारणे, पैसे स्वीकारणे आणि हस्तांतर करणे अशी कामे ते करत असत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या दोघांच्याही आर्थिक व्यवहारांची पोलखोल केली आहे.
हे ही वाचा:
ईडी करणार सचिन वाझेवर प्रश्नांचा मारा!
अफगाणिस्तानमध्ये धोका; भारतीय अधिकाऱ्यांना आणले माघारी
गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा विशेष गाड्या सोडा!
सहकार क्षेत्र पिंजून काढण्यास अमित शहांनी केली सुरुवात
लष्कर ए तोयबासाठी काम करणारा एक जण कुपवाड्यात आयटीआयमध्ये काम करत असे. तो संघटनेसाठी गुप्त कारवायाही करत असे.