काशी स्थित अन्नपूर्णा मठ मंदिराचे महंत श्री.रामेश्वर पुरी यांचे निधन झाले आहे. वाराणसी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवार, १० जुलै रोजी रामेश्वर पुरी यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे.
महंत रामेश्वर पुरी हे देशातील धार्मिक क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व मानले जातात. शनिवारी त्यांनी ६७ व्या वर्षी आपले प्राण सोडले. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव काशी येथील अन्नपूर्णा मठ मंदिर येथे ठेवण्यात आले आहे. तर रविवारी सकाळी मंदिराच्या प्रांगणातून त्यांची अंतिम यात्रा निघणार आहे.
हे ही वाचा:
असामान्य कार्य करणाऱ्या सर्वसामान्य स्वयंसेवकांचा चित्रगौरव
‘टीका वाली नाव’…बिहारमधले अनोखे लसीकरण केंद्र
प्राण्यांचा छळ करणाऱ्या भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा
बैलगाडीलाही पेलवेना काँग्रेसचा भार
हरिद्वार येथील कुंभमेळ्यात महंत रामेश्वर पुरी यांना कोविडची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा झाल्यावर ते पुन्हा लखनऊ येथे आले. तर नंतर त्यांनी अन्नपूर्णा मंदिरात निवास पुन्हा सुरू केला. पण गेल्या महिन्यात ११ जून रोजी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. तर शुक्रवारी त्यांना वाराणसी येथील एका खासगी रुग्णालयात हलवले गेले. पण शनिवार दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी माता भगवतींचे नामस्मरण करत देहत्याग केला.
महंत रामेश्वर पुरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “काशी अन्नपूर्णा मंदिराचे महंत रामेश्वर पुरी जी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. त्यांचे जाणे ही समाजाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. त्यांनी धर्म आणि अध्यात्म यांना समाजसेवेशी जोडून सदैव लोकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित केले. ॐ शांति!” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काशी अन्नपूर्णा मंदिर के महंत रामेश्वर पुरी जी के देहावसान से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना समाज के लिए एक अपूरणीय क्षति है। उन्होंने धर्म और अध्यात्म को समाज सेवा से जोड़कर लोगों को सामाजिक कार्यों के लिये निरंतर प्रेरित किया। ॐ शांति !
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2021