हॉटेलात आलेल्या अनोळखी ग्राहकाने हॉटेलमालकाने पाळलेल्या मांजरीची हत्या करून काढल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अनोळखी ग्राहकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर या ठिकाणी चेतन नावाचे हॉटेल आहे, या हॉटेल मालकाने स्वीटी उर्फ अमु नाव असलेली नर मांजर पाळली होती. पाच महिन्याची हि नर मांजर हॉटेलातील टेबलाखाली वावरत असे, तसेच ग्राहकाच्या पायाजवळ घोळत होती. ३ जुलै रोजी दुपारच्या वेळी एक अनोळखी ग्राहक या हॉटेलात जेवणासाठी आलेला होता,त्या दरम्यान हि मांजर त्या ग्राहकाच्या टेबलाखाली घुटमळत ग्राहकाच्या पायाजवळ येत होती. दोन वेळा त्या ग्राहकाने त्या मांजरीला लाथेनेचे दूर केले मात्र ती पुन्हा त्या ग्राहकाच्या पायाजवळ घोळू लागताच या ग्राहकाने जोरात त्या मांजरेला लाथ मारली असता ती मांजर दूर फेकल्यागेली आणि तिच्या तोंडाला जखम झाली.
हे ही वाचा:
ट्रान्स हार्बर लिंकसाठी येणार ५५० झाडांवर संक्रात
निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या
रेल्वेमंत्र्यांनी कर्मचाऱ्याला मिठी का मारली?
मांजरीचा विव्हळण्याचा आवाज ऐकून हॉटेलचा मालक धावतच मांजरीजवळ आला व त्याने मांजरीला उचलून देवनार येथील प्राण्याच्या रुग्नालयात उपचारासाठी घेऊन गेला. मांजरीला मुका मार लागल्याने तिला एक्सरे काढण्यासाठी नेण्यात आले असता मांजरीने तिथेच प्राण सोडले.
या घटनेची माहिती प्राणी मित्र संघटनेचे आणि ओम फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष ब्रिज भानुशाली यांना दोन दिवसांनी कळताच त्यांनी हॉटेल मालक चेतन गौडा यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सर्व माहिती भानुशाली याना दिली. ब्रिज भानुशाली यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन हॉटेलात आलेला अनोळखी ग्राहकाविरुद्ध मांजरीच्या मृत्यूस जबाबदार म्हणून गुन्हा दाखल केला असून त्या ग्राहकाच्या शोधासाठी हॉटेल आणि परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती ओम फाउंडेशनचे अध्यक्ष प्राणी मित्र ब्रिज भानुशाली यांनी दिली आहे.