जम्मू आणि काश्मिरमध्ये सुरक्षा बलांची कारवाई
काश्मिरच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये जम्मू- काश्मिर पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पुलवामा, कुलगाम आणि कुपवाडा याठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये पाच दहशतवाद्यांना मारण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दहशतवाद्यांचा खात्मा पुलवामामधील पुचाल भागात करण्यात आला. ही मोहिम पोलिस आणि सैन्याने ही मोहिम संयुक्तपणे राबवली होती. दुसरीकडे आणखी एका कारवाईत लष्कर-ए-तोयबाशी निगडीत दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले. ही कारवाई देखील कुलगाम पोलिस आणि ०१ आरआर यांनी संयुक्तपणे झोडार भागात राबवली होती.
हे ही वाचा:
हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन
सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या खडसेंची तब्येत बिघडली
दहावीच्या शिक्षकांना आता जुंपणार निवडणुकांसाठी
ही बेसुमार वृक्षतोडणी कशासाठी?
त्याशिवाय हिजबुल मुजाहिदीनचा मुख्य दहशतवादी मेहराजुद्दील हलवाई याला देखील भारतीय सुरक्षादलाने रातोरात केलेल्या कारवाईत ठार मारण्यात आले. काश्मिरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हांडवारा या भागात बुधवारी (७ जुलै रोजी) सैन्याने ही कारवाई केली होती.
यामुळे जम्मू काश्मिर खोऱ्याचे आयजीपी विजय कुमार यांनी सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सुरक्षा दलाने गेल्या चोविस तासात पाच दहशतवाद्यांना ठार मारले आहे.
“काश्मिर मध्ये गेल्या २४ तासात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. पोलिस आणि सुरक्षा बलांचे कोणत्याही नुकसानाशिवाय दहशतवाद्यांना मारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!” असे त्यांनी सुरक्षा बलांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.