महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवसही चांगलाच गाजला. १२ भाजपा आमदारांच्या विरोधात करण्यात आलेल्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिरूप विधानसभा भरवली. भाजपाची ही प्रतिरूप विधानसभा ही चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली. या प्रतिविधानसभेतून ठाकरे सरकारवर चांगलाच हल्ला चढवण्यात आला आहे.
प्रतिरूप विधानसभेत बोलताना महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कारभाराची पार चिरफाड केली. यावेळी ठाकरे सरकारने कोण कोणत्या प्रकरणात जबाबदारी झटकत केंद्र सरकार कडे बोट दाखवले याचा पाढाच फडणवीसांनी वाचून दाखवला. तर पुढे जाऊन सगळे जर केंद्र सरकारने करायचे तर तुम्हाला काय वडे तळायला बसवलाय का? असा सवाल फडणवीस यांनी केला.
हे ही वाचा:
भास्कर जाधव नरकासूर, तर उद्धव ठाकरे सोंगाड्या
१२ आमदारांच्या निलंबनाविरुद्ध भाजपाचे राज्यभर आंदोलन
अनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांची कोठडी वाढविली १४ दिवसांनी
धर्मांतर केलेल्या हजारो हिंदू मुली दुबईच्या शेखला विकल्या का?
काय म्हणाले फडणवीस?
शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकारने करावी, कर्जमाफी केंद्र सरकारने करावी, पन्नास हजाराची घोषणा हे करणार पण पैसे केंद्र सरकारने द्यावेत, दोन चक्री वादळ येऊन गेल्यानंतर मदत केंद्राने करावी, पिक विमा केंद्र सरकारवर, राज्याचे अर्थकारण केंद्रावर, मराठा आरक्षण केंद्र सरकारने द्यावे, ओबीसी आरक्षण केंद्र सरकारने द्यावे, पदोन्नतीचे आरक्षणही केंद्र सरकारवर, १०० कोटींच्या वसुलीवर कारवाई केंद्र सरकारने करावी, रेमडेसिवीर केंद्र सरकारने द्यावी, ऑक्सिजन केंद्र सरकारने पुरवावा, ब्लॅक फंगस केंद्र सरकारवर ढकलायचे, पीपीई किट केंद्र सरकार, लसीकरण केंद्र सरकारवर पण सर्वाधिक लसीकरण झालं तर ते मात्र राज्याचे यश. मग सगळंच जर केंद्र सरकारने करायचे तर तुम्हाला काय इथे वडे तळायला बसवलाय? असा हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे.